Mumbai Pune Missing Link: लोणावळा तलावाखालून जाणारा जगातील सर्वात रुंद बोगदा; मुंबई पुण्याला जोडणारा ड्रीम प्रोजेक्ट कधी सुरु होणार?

Mumbai Pune Missing Link Update: मुंबई पुण्याला जोडणारा मिसिंग लिंक पुढच्या वर्षी सुरुवातीला सुरु होईल. या प्रोजेक्टमुळे मुंबई-पुणे अंतर आणखी कमी होणार आहे.
Mumbai Pune Missing Link
Mumbai Pune Missing LinkSaam Tv
Published On
Summary

मुंबई पुणे मिसिंग लिंक कधी सुरु होणार?

मुंबई पुणे जोडण्यासाठीचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट

लोणावळा तलावाच्या तळाशी बोगदा

मुंबई पुण्याला जोडणारा मिसिंग लिंक हा लवकरच सुरु होणार आहे. हा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टचे काम अंतिम टप्प्यात सुरु आहे. या प्रकल्पाअंतर्गत आता लोणावळ्याला तलावाच्या तळाखालून बोगडा उभारण्यात आला आहे. हा जगातील सर्वात रुंद बोगदा असणार आहे. याचे कामदेखील पूर्ण झाले आहे. लवकरच आता मिसिंग लिंकचे काम पूर्ण होईल.

Mumbai Pune Missing Link
Latur Vande Bharat Express : लातूरकरांसाठी सर्वात मोठी खुशखबर, पुणे-मुंबईसाठी धावणार वंदे भारत

नवीन वर्षात सुरु होणार मिसिंग लिंक (Missing Link Innaugarate In New Year)

या प्रोजेक्टअंतर्गत मार्गावर प्रकाश यंत्रणा आणि इतर तांत्रिक काम पूर्ण केले जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर विविध विभागांच्या चाचण्या घेण्यात येतील. त्यानंतर वर्षाअखेर सर्व परवानग्या घेऊन प्रक्रिया पूर्ण करणार आहे. नवीन वर्षात मिसिंग लिंक खुला करण्यात येणार आहे.

३० मिनिटांचा वेळ वाचणार

मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे हे अंतर आणखी कमी होणार आहे. यामुळे तुमचा अर्धा तास (३० मिनिटे) वेळ वाचणार आहे. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.

मिसिंग लिंक कसा असणार आहे? (Missing Link)

मिसिंग लिंक हा १३.२ किलोमीटर लांबीचा असणार आहे. या मार्गावर आठ मार्गिका असणार आहे. हा एक जोडरस्ता आहे. या प्रकल्पातील काही भाग हा भूयारी मार्ग असणार आहे. लोणावळा तलावाच्या खाली बोगदा बांधला आहे. या मिसिंग लिंकवर दोन भूयारी मार्ग असणार आहे. पहिला मार्ग ९ किलोमीटर आणि दुसरा मार्ग २ किलोमीटर लांब असणार आहे. हा मार्ग १३२ फूट उंच असणार आहे.

Mumbai Pune Missing Link
Vande Bharat Sleeper Trains : दिवाळीत मिळणार गुडन्यूज! वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्वाची अपडेट

मुंबई पुणे मार्गावरील मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात सुरु आहे. मार्गावर प्रकाश यंत्रणा, बोगद्यातील काही तांत्रिक काम सुरु आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर २०२६ च्या सुरुवातीला हा मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येईल. या महामार्गावर वाहने १२० किमी प्रति तासाने धावतील.

Mumbai Pune Missing Link
Mumbai Local News : ऑटोमॅटिक दरवाजांच्या लोकलची यशस्वी चाचणी, 'या' महिन्यात येणार मुंबईकरांच्या सेवेत, रेल्वे मंत्रालयानं दिली महत्त्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com