

मुंबईतील वाहतूक उद्या मोठा बदल
गेट वे ऑफ इंडिया येथे India-France Year of Innovation कार्यक्रम होणार
दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे मंगळवारी भारत-फ्रान्स यांचा संयुक्त India-France Year of Innovation हा कार्यक्रम होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल करण्यात आले आहे. दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. फ्रान्सच्या वाणिज्य दूतवासाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १४ ते २२ फेब्रुवारीदरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. याची सुरुवात उद्या मंगळवारपासून होणार आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे भारत दौऱ्यावर येणार आहे. ते तीन दिवस भारत दौऱ्यावर असणार आहे. आज रात्री ते मुंबईत येणार आहे.यानंतर उद्या सकाळी ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये भारत फ्रान्स इनोव्हेशन फोरम होणार आहे. या ठिकाणी दोन्ही देशांमधील व्यवसायिका, अनेक दिग्गज मंडळी उपस्थित असणार आहेत.
संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन गेट वे ऑफ इंडिया येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. हा कार्यक्रम वर्षभर चालणार आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञान, संस्कृती आणि उद्योग व्यवसायात देवाणघेवाण वाढेल. मात्र, यामुळे मुंबईतील अनेक रस्ते बंद असणार आहे.
पोलिस उपायुक्तांच्या अधिसूचनेनुसार, गेट वे ऑफ इंडिया परिसरात अनेक मान्यवर येणार असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरळीत वाहतूक आणि सुरक्षिततेसाठी उद्या दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत विशेष वाहतूक व्यवस्था लागू करण्यात येणार आहे.
हे रस्ते असणार बंद
छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, श्यामा प्रसाद मुखर्जी चौक बंद असणार आहे. फक्त आपत्कालीन वाहनासाठी हा मार्ग सुरु असेल. नॉर्थ कोर्ट ते अॅडम स्ट्रीट जंक्शनपर्यंतचा पी. रामचंदानी मार्गदेखील वाहतूकीसाठी बंद असणार आहे. यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
रिगल जंक्शनकडे येणाऱ्या वाहनांना शहीद भगतसिंग मार्ग, महाकवी भूषण रोड, बीके बोमन बेहराम रोडकडे वळवण्यात आले आहे. पी. रामचंदानी मार्गावरील वाहतूक अल्वा चौक, रेडिओ क्लब, हाजी नियाज आझम रोड आणि जगन्नाथ पालव चौक मार्गे वळवण्या येईल. अॅडम स्ट्रीट आणि पी. रामचंदानी मार्गावरील टॅक्सी स्टँड आणि बेस्ट बसचे थांबे बंद राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.