
मुंबईत सध्या मेट्रोचे जाळे पसरत आहे. मेट्रोमुळे अनेक ठिकाणे जवळ आली आहेत. याचसोबत मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ खूप कमी झाला आहे. याचसोबत आरामदायी प्रवास होत आहे.दरम्यान, आता लवकरच ठाणे ते दक्षिण मुंबईला जोडणारी मेट्रो सुरु होणार आहे. दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ही मेट्रो तयार केली जाणार आहे.
दक्षिण मुंबईतील वाढती वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने राज्य सरकरला मेट्रोचा प्रस्ताव दिला होती. आता भूमिगत मेट्रोल लाइन ११ च्या प्रस्तावाला मंजुरीदेखील देण्यात आली आहे. लवकरच या प्रकल्पाचे काम सुरु होईल.
मिळालेल्या माहितीनुसार,राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. या प्रकल्पांबाबत एक बैठक घेण्यात आली. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मेट्रो ११ (Metro 11) च्या प्रस्तवाला मंजुरी दिली. मंत्रमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मेट्रो ११ कशी असणार आहे?
मेट्रो ११ साठी वडाळा डेपो ते गेट वे ऑफ इंडिया या दरम्यान भूमिगत मार्गिका असणार आहे. ही मार्गिका १६ किलोमीटर लांबीची सणार आहे. श्यामप्रसाद मुखर्जी चौक आणि हॉर्मिनल सर्कल या ठिकाणांवरुन ही मेट्रो धावणार आहे.
या मेट्रो ११ प्रकल्पासाठी सुमारे २४,००० कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे. जपानच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेकडून हा निधी उपलब्ध होणार आहे. या मार्गिकेमुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे.
भूमिगत मेटोची स्थानके (Metro 11 Stations)
मुंबई मेट्रो रेलच्या अहवालानुसार, या मेट्रो ११ च्या लाइनवर १३ स्थानके असणार आहे. त्यातील आणिक आगार वगळता उरलेली १२ स्थानके भूमिगत असणार आहे. ही मेट्रो लाइन दक्षिण मुंबईतील नागपाडा, भेंडीबाजार या ठिकाणावरुन धावणार आहे. या ठिकाणी सर्वाधिक गर्दी असते. य रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.