Mumbai Metro: ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया; आणखी एका मेट्रोचा प्रस्ताव, 13 ठिकाणी असणार स्टॉप

Mumbai Metro: मुंबई मेट्रो -११ च्या मंजुरीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आलाय. ही भुयारी मेट्रो 17.51 किमी लांबीची असणार आहे. या मेट्रो मार्गिकेमुळे शीव, वडाळा, शिवडी, भायखळा, भेंडी बाजारसारखे परिसर जोडले जाणार आहेत.
Mumbai Metro
underground Metro line 11 saam tv
Published On

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने आणिक आगार-गेट वे ऑफ इंडियादरम्यान भुयारी मेट्रो-11 बांधण्याचा निर्णय घेतलाय. यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान या भुयारी मेट्रो अशी असणार आहे, कुठे-कुठे थांबे असणार, आदीची माहिती समोर आलीय.

ही भुयारी मेट्रो 17.51 किमी लांबीचा प्रवास करणार असून या मेट्रो मार्गिकेमुळे शीव, वडाळा, शिवडी, भायखळा, भेंडी बाजारसारखे भाग जोडले जाणार आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.दरम्यान कुलाबा वांद्रे-सीप्झ - आरे मेट्रो 3 मार्गिकचे काम येत्या काही महिन्यांत पूर्ण होईल. आता 'एमएमआरसी'ने मेट्रो 11 मार्गिकच्या कामाला सुरुवात करण्याच्यादृष्टीने विचार सुरू केलाय. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी मेट्रो 11 मार्गिकेचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविलाय.

Mumbai Metro
Railway Exam Rules: रेल्वे परीक्षेच्या नियमात मोठा बदल; पेपरवेळी परीक्षार्थींना 'या' गोष्टीची असणार मुभा

या मार्गावर एकूण 13 स्थानके असणार आहेत. त्यापैकी अनिक डेपो वगळता सर्व 12 स्थानके भुयारी असणार आहेत. वडाळा ते अपोलो बंदर मेट्रो 11 ही ठाण्यातील गायमुख ते वडाळा या मेट्रो 4 अ आणि मेट्रो 4 अची विस्तारित मार्गिका असेल. अॅक्वा लाइन, मोनोरेल आणि भायखळा आणि सीएसएमटीसारख्या उपनगरीय रेल्वे स्थानकांशी जोडली जाणार आहेत. त्यामुळे उपनगरातून थेट दक्षिण मुंबईत पोहोचता येणार आहे.

मेट्रो मार्गिका 11 वरील 13 स्थानकांपैकी ८ स्थानके कट अँड कव्हर पद्धतीने बांधण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरसीने दिलीय. यात खोदकाम, बोगदा बांधणे, पृष्ठभाग पुन्हा वापरण्यायोग्य करणे आदी कामांचा समावेश आहे. तर, उर्वरित पाच स्थानके न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड वापरून विकसित केली जातील.

एमएमआरसीएलनं वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, 2031 पर्यंत दररोज 5,80,000 प्रवासी या मार्गावर प्रवास करतील. तर 2041 पर्यंत ही संख्या 869,000 पर्यंत पोहोचेल. दरम्यान हा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या विचारात आहे. राज्याची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याची माहिती एमएमआरसीने दिलीय.

थांबा कुठे असणार?

वडाळा, शिवडी, वाडी बंदर, रे रोडहून पश्चिमेकडे भायखळा, नागपाडा जंक्शन, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, सीएसएमटी, जीपीओ, हॉर्निमन सर्कल, गेट वे ऑफ इंडियाजवळ अपोलो बंदर असे थांबा असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com