Vande Bharat Train: मुंबई-कोकण मार्गावर वंदे भारत ट्रेनचा अपघात; मोकाट जनावरांना धडकली ट्रेन, इंजिन पडलं बंद
कुडाळ रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत ट्रेनला अपघात
भटक्या जनावरांना धडक, तीन गुरांचा मृत्यू
धडकेनंतर ट्रेनचं इंजिन बंद पडल्याने मोठा खोळंबा
मुंबई-कोकण मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा कुडाळ रेल्वे स्टेशनजवळ अपघात झालाय. मुंबईकडे जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनने भटक्या जनावरांना धडक दिली. ही धकड इतकी भीषण होती की, यात तीन गुरांचा मृत्यू झाला. धडकेमुळे ट्रेनच्या इंजिनात बिघाडदेखील झाला. इंजिन बंद पडल्यामुळे प्रवाशांचा दीडतास खोळंबा झाला.
इंजिन बंद पडल्यानं वंदे भारत ट्रेन कुडाळ रेल्वे स्थानकात दीड तास अडकून पडली होती. दरम्यान ट्रेनला दुसरे इंजिन जोडल्यानंतर वंदे भारत मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. जनावरांच्या धडकेत वंदे भारत ट्रेनंच मोठं नुकसान झालंय. ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. ट्रेनचा पुढील भाग पूर्ण तुटलाय. अपघातग्रस्त ट्रेनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
जत्रेसाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना मोठा फटका
कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील मसूरे आंगणेवाडीमधील श्री देवी भराडी मातेचा जत्रोत्सवाला 9 फेब्रुवारीपासून सूरूवात झाली. या यात्रेसाठी मोठ्या संख्यने चाकरमानी मुंबईहून कोकणाच्या दिशेने निघालेत. तर काही परतीच्या प्रवासालाही लागलेत.
मात्र वंदे भारत एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्हीकडील वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे भाविकांना मोठा फटका बसलाय. गाड्या सुमारे चार ते पाच तास उशिराने धावत आहेत. कोकण रेल्वचे वेळापत्रक कोलमडलं आहे. त्यामुळे आंगणेवाडी जत्रेसाठी आलेल्या भाविकांचा यामुळे मोठा खोळंबा झालाय. तसेच प्रवाशांना ताटकळत स्थानकात उभं रहावं लागतंय.
कोकणात वंदे भारत ट्रेनला मोठा प्रतिसाद
कोकणाचे निसर्ग सौंदर्य, समुद्र किनारे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. हिवाळी सुट्ट्या, नाताळ, शिमगा, उन्हाळी सुट्टी, पावसाळा, गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या अनेक पटींनी वाढत असते. भारतीय रेल्वेत सध्या वंदे भारत ट्रेन ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. देशातील अनेक भागात वंदे भारत ट्रेन धावते. कोकणातही वंदे भारत ट्रेन धावत असून बहुसंख्य प्रवासी वंदे भारत ट्रेनला पसंती देतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

