Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Nitesh Rane on Raj-Uddhav Thackeray : 'दोन कुटुंब एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे. हा त्यांच्या कुटुंबाचा विषय आहे. यांचा विषय तर थेट अंतरपाटापर्यंत गेला. आता यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना-मनसेवाल्यांनी सांगावं', असा टोला नितेश राणे यांनी यावेळी लगावला आहे.
Nitesh Rane on Raj-Uddhav Thackeray
Nitesh Rane on Raj-Uddhav Thackeray Saam Tv News
Published On

मुंबई : 'दोन ठाकरे बंधु एकत्र आले ते चांगलंच झालं, पण यांच्यातील नवरा आणि नवरी कोण? हे शिवसेना-मनसेवाल्यांनी सांगावं, असा टोला राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे. यांच्या स्टेजवर समाजवादी नेते, कॉम्रेड लोक दिसले, आता यांनी फक्त सीमीच्या दहशतवाद्यांशी युती करायची राहिली आहे, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांनी मराठीच्या मुद्यावर भाजपला आव्हान दिलं. त्यावर नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नितेश राणे पुणे म्हणाले की, 'दोन कुटुंब एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे. हा त्यांच्या कुटुंबाचा विषय आहे. यांचा विषय तर थेट अंतरपाटापर्यंत गेला. आता यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना-मनसेवाल्यांनी सांगावं', असा टोला नितेश राणे यांनी यावेळी लगावला आहे.

Nitesh Rane on Raj-Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

हिंदू समाज आता यांना घरात बसवणार

'नऊ महिन्याआधीच महायुतीला लोकांनी निवडून दिलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आम्हीच निवडून येऊ', असा विश्वासही नितेश राणे यांनी व्यक्त केला. 'मुंबईतील हिंदू समाज आता यांना परत घरात बसवणार', असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी कोणत्या शाळेत शिकले असा प्रश्न केला. त्यावर नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. 'मोदी शाळेत ज्या शाळेत शिकले त्या शाळेत शिकण्याची यांची लायकी नाही', असा टोला त्यांनी लगावला. 'एकट्या देवेंद्र फडणवीसांनी काय काय केलं हे महाराष्ट्राने पाहिलं. दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर हिंदू विरोधी देशद्रोह्यांना सर्वात मोठा आनंद झाला असेल', असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

मी राज ठाकरेंचे आभार मानतो

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज वाखरी येथे जाऊन संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतलं. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांना मानाचा फेटा बांधून मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. पूजा झाल्यानंतर पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यादरम्यान, आज झालेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या झालेल्या विजयी मेळाव्याबाबतही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, 'दोघं भाऊ एकत्र येण्याचं श्रेय मला मिळत असेल तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो. यामुळे बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळत असेल', असं फडणवीस यावेळी म्हणाले. 'मराठीबद्दल एक शब्दही न बोलता, आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या. हा मराठीचा विजयी उत्सव नव्हता तर ही रुदाली होती, आणि तया रुदालीचं दर्शन आपण घेतलेलं आहे', अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

Nitesh Rane on Raj-Uddhav Thackeray
Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त, कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com