Mumbai News: दिवाळीआधीच मुंबईत फटाके फोडण्यास बंदी, पोलिसांकडून नियमावली जाहीर

Mumbai Firecracker Ban: मुंबईमध्ये दिवाळीआधी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत नियमावली जाहीर केली आहे.
Mumbai News: दिवाळीआधीच मुंबईत फटाके फोडण्यास बंदी, पोलिसांकडून नियमावली जाहीर
Mumbai Firecracker BanSaam Tv
Published On: 
  • मुंबईत सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी

  • दिवाळीआधी मुंबई पोलिसांची फटाक्यांबाबत नवीन नियमावली जाहीर

  • मुंबईत ६ ऑक्टोबरपासून फटाके फोडण्यावर निर्बंध

  • ४ डिसेंबरपर्यंत मुंबईत फटाके फोडण्यावर बंदी

दिवाळी सण जवळ आला आहे. दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. आता मुंबई पोलिसांनी फटाके फोडण्याबाबत नियमावली जारी केली आहे. मुंबईतील रहदारीच्या रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. ६ ऑक्टोबर मध्यरात्रीपासून ते ४ डिसेंबरपर्यंत मुंबईत फटाके फोडण्यास बंदी असेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे.

मुंबईमध्ये दिवाळीपूर्वी फटाके फोडण्याबाबत मुंबई पोलिसांनी नियम जाहीर केले आहे. या नियमानुसार मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर फटाके फोडल्यावर कारवाई केली जाणार आहे. मुंबईत होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण यामुळे पोलिसांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. हे नियम ६ ऑक्टोबर म्हणजेच आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. ४ डिसेंबरपर्यंत हे नियम लागू असणार आहे. त्यामुळे या कालावधीत जर कुणी नियमांचे उल्लंघन केले तर पोलिस त्यांच्यावर कारवाई करणार आहेत.

मुंबईमध्ये लेझर लाईट आणि सर्च लाइट बीम्सवर देखील बंदी घालण्यात आली आहे. वायू आणि ध्वनीप्रदूषणामुळं होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानीची मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेऊन स्वतःहून याचिका दाखल केली होती. यासंदर्भात हायकोर्टानं २२ सप्टेंबर २०२६ रोजी आदेश जारी केले होते. त्यानुसार, मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

Mumbai News: दिवाळीआधीच मुंबईत फटाके फोडण्यास बंदी, पोलिसांकडून नियमावली जाहीर
Mumbai News: मुंबईत धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, हात सटकला अन् नाल्यात पडला

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. पर्यावरणाला हानी पोहचवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येईल. उल्लंघन करण्याऱ्यावर ध्वनी प्रदूषण नियम २०००, पर्यावरण कायदा १९८६, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ आणि स्फोटक कायदा १८८४ अंतर्गत खटला चालवला जाऊ शकतो.

Mumbai News: दिवाळीआधीच मुंबईत फटाके फोडण्यास बंदी, पोलिसांकडून नियमावली जाहीर
Mumbai News: बायकोच्या अनैतिक संबंधावरून वाद, कामावर गेलेला सीए घरी परत आलाच नाही; मुंबईत खळबळ

त्याचसोबत, मुंबई पोलिसांनी पतंग उडवण्यावर मागच्या महिन्यात घातलेल्या बंदीचा कालावधी ६० दिवसांनी वाढवला आहे. आयएनएस शिखा नौदलाच्या एअर स्टेशन आणि त्याच्या आसपासच्या परिसरात पतंग उडवण्यावर ही बंदी असणार आहे. आझाद नगर, सुंदर नगर या भागात ही बंदी कायम असणार आहे. विमान आणि हेलिकॉप्टर उड्डाणामध्ये अडथळे येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai News: दिवाळीआधीच मुंबईत फटाके फोडण्यास बंदी, पोलिसांकडून नियमावली जाहीर
Mumbai News : मुंबई महापालिकेत खळबळ! दोन बड्या अधिकाऱ्यांचा मोठा गेम उघड, लाचखोरीचा गुन्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com