Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे थरार! मिसिंग लिंकवर २ भीषण अपघात; रस्त्यावर लागला केळींचा ढीग

Mumbai-Pune Expressway Missing Link Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकवर पहाटे दोन भीषण अपघात झाले. केळींचा टेम्पो पलटी झाल्यानंतर बस आणि ट्रकची धडक झाली. ६ ते ७ प्रवासी जखमी झाले.
Mumbai-Pune Expressway Missing Link Accident
Mumbai-Pune Expressway Missing Link AccidentSaam TV
Published On: 

दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक (कनेक्टिंग लिंक) वर आज पहाटेपासून अपघातांची मालिका पाहायला मिळाली. अवघ्या काही तासांच्या अंतराने झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून ६ ते ७ जण जखमी झाले आहेत.

पहिली घटना मध्यरात्री सुमारे ३ वाजेच्या सुमारास घडली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कनेक्टिंग लिंकवर अतिवेगामुळे चालकाचा ताबा सुटल्याने केळी वाहतूक करणारा एक पिकअप टेम्पो पलटी झाला. या अपघातात चालक समीर शेख हा जखमी झाला असून त्याच्यावर खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टेम्पो पलटी झाल्याने त्यातील केळी रस्त्यावर विखुरली जाऊन केळींचा मोठा ढीग साचला होता. महामार्ग पोलिसांकडून अपघातग्रस्त टेम्पो बाजूला करून रस्ता साफ करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.

Mumbai-Pune Expressway Missing Link Accident
IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

यानंतर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास लोणावळा हद्दीत दुसरा अपघात घडला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात बसमधील ६ ते ७ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवाशांवर खोपोली नगरपालिका रुग्णालयात, एकावर खोपोली-शीळ फाटा येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये, तर उर्वरित जखमींना पनवेलच्या महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Mumbai-Pune Expressway Missing Link Accident
जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट दस्तुरी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आणि वाहतूक सुरळीत केली. या सलग अपघातांमुळे द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com