Rahul Gandhi detained : राजधानी तापली! राहुल आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, काँग्रेस कार्यकर्त्यांची घरपकड

Rahul Gandhi detained during Election Commission protest : निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत आक्रमक मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह अनेक विरोधी खासदारांना ताब्यात घेतले.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी राजधानी दिल्लीत काढलेल्या आक्रमक मोर्चादरम्यान मोठा राडा झाला. निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाणाऱ्या या मार्चला दिल्ली पोलिसांनी १०० मीटर आधीच रोखल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक विरोधकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले आहे.

आंदोलक खासदारांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत "व्होट चोर, गद्दी सोड" अशा तीव्र घोषणा दिल्या. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर प्रमुख खासदारांना ताब्यात घेऊन बसमधून नेले. या घटनेमुळे दिल्लीत राजकीय वातावरण अत्यंत तापले असून पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com