

मुंबईत ३९ वर्षीय सीएची आत्महत्या
गोरेगाव- राममंदिर रेल्वे स्थानकादरम्यान आढळला मृतदेह
सीएच्या मृत्यूप्रकरणी पत्नी आणि मित्राविरोधात गुन्हा
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबईमध्ये सीएने ट्रेनसमोर उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. गोरेगाव-राममंदिर रेल्वे स्थानकादरम्यान ३९ वर्षीय सीएने आत्महत्या केली. वांद्रे येथील एका खासगी कंपनीत तो कार्यरत होता. या प्रकरणी सीएच्या पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पत्नीचे परपुरुषासोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयातून मानसिक तणाव असल्याचे सीएने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती तपासातून उघड झाली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने बहिणीसह मित्राला व्हॉट्सअॅप मेसेज केला होता. मेसेजमध्ये पत्नीचे एका तरुणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून बोरीवली रेल्वे पोलिसांनी पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला. सीएच्या मोबाईलमध्ये आत्महत्येपूर्वी पाठवलेला व्हॉट्सअॅप मेसेज पोलिसांच्या हाती लागला आहे. रविवारी झालेल्या कौटुंबिक वादानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. दुपारी तक्रारदाराच्या मुलीने फोन केल्यानंतर तो रुग्णालयात असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली.
रुग्णालयात त्याला मृत घोषित केल्यानंतर प्राथमिक तपासात रेल्वे स्थानक परिसरात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाचा पुढील तपास बोरीवली रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांकडून आत्महत्या केलेल्या सीएची पत्नी आणि तिच्या मित्राविरोधातील आरोपांची पडताळणी केली जात आहे. पोलिसांनी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.