Mumbai News: मुंबई आहे की गाव? लाईट नसल्याने मोबाईची टॉर्च लावून अंत्यसंस्कार, VIDEO समोर

Mumbai crematorium no electricity: मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये मोबाईलच्या टॉर्चवर एका व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत लाईट नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
Mumbai News: मुंबई आहे की गाव? लाईट नसल्याने मोबाईची टॉर्च लावून अंत्यसंस्कार, VIDEO समोर
Saam Tv
Published On
  • स्मशानभूमीत वीज नसल्याने मोबाईल टॉर्चवर अंत्यसंस्कार

  • मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व स्मशानभूमीत दोन दिवस वीज बंद

  • मुंबईत अंधारात अंत्यसंस्कार करण्याची नागरिकांवर वेळ

  • स्मशानभूमीत वीज नसल्याने नागरिकांची गैरसोय

संजय गडदे, मुंबई

जोगेश्वरी पूर्व परिसरातील राजेश्वर वामन रागिनवार हिंदू स्मशानभूमीत अत्यंत संवेदनशील प्रसंगी नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी त्रास सहन करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्काराच्या मुख्य शेडमधील वीजपुरवठा दोन दिवसांपासून खंडित असल्याने रात्री अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना मोबाईल टॉर्च आणि बॅटरीच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

प्रतापनगर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरातील नागरिक अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत पोहोचले. मात्र, अंत्यसंस्काराच्या मुख्य शेडमध्ये पोहोचताच तेथे अंधार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, स्मशानभूमीतील मुख्य शेडमधील पथदिवे आणि वीजपुरवठा मागील दोन दिवसांपासून बंद होता. त्यानंतरही प्रशासनाकडून पर्यायी प्रकाशव्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला. अखेर अंत्यविधीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून उपस्थितांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च आणि बॅटऱ्या सुरू करून त्याच प्रकाशात अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण केले.

Mumbai News: मुंबई आहे की गाव? लाईट नसल्याने मोबाईची टॉर्च लावून अंत्यसंस्कार, VIDEO समोर
Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार सुरू होते, त्या मुख्य शेडमध्ये अंधार असताना स्मशानभूमीच्या आवारातील वखार आणि DRK केबिनमध्ये मात्र वीजपुरवठा तसेच एसी सुरू असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या नियोजनावर आणि देखभालीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकाराबाबत संबंधित आरोग्य अधिकारी महेंद्र खदाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.

Mumbai News: मुंबई आहे की गाव? लाईट नसल्याने मोबाईची टॉर्च लावून अंत्यसंस्कार, VIDEO समोर
Mumbai News : मुंबईत धुरकं! दृश्यमानतेत घट, वाढलेल्या प्रदूषणाचा परिणाम?

स्मशानभूमी ही नागरिकांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील आणि भावनिक प्रसंगांशी निगडित जागा आहे. अशा ठिकाणी प्रकाश, वीज आणि इतर मूलभूत सुविधा सुरळीत असणे आवश्यक असताना वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, स्मशानभूमीतील वीज व्यवस्था तात्काळ पूर्ववत करावी, पर्यायी वीज व प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून द्यावी आणि वीजपुरवठा दोन दिवस खंडित राहण्यामागील कारणांची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. तसेच या प्रकरणात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे.

Mumbai News: मुंबई आहे की गाव? लाईट नसल्याने मोबाईची टॉर्च लावून अंत्यसंस्कार, VIDEO समोर
Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल? ८०० अभियंत्यांची उचलबांगडी होण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com