इराण-इस्रायलच्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा; पुण्यातील स्मशानभूमी बंद, रत्नागिरीत डबल LPG सिलेंडरवर निर्बंध

LPG Crisis in Maharashtra: इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम जागतिक स्तरावर ऊर्जा पुरवठ्यावर होऊ लागला आहे. महाराष्ट्रात एलपीजी टंचाईची चिन्हे दिसत आहेत. पुणे आणि रत्नागिरीमध्ये इंधनाची उपलब्धता अनिश्चित झाल्यामुळे पुरवठा खंडित होण्याच्या मार्गावर आहे.
LPG Crisis in Maharashtra:
Impact of Iran-Israel conflict in India; Signs of LPG cylinder shortage in Maharashtra.saam tv
Published On
Summary
  • इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

  • महाराष्ट्रात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.

  • रत्नागिरीमध्ये डबल सिलिंडरवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

पश्चिम आशियातील युद्धाचे भारतावर परिणाम होऊ लगालेत. इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होतोय. महाराष्ट्रातील गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला, सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. पुणे शहरात जाणवू लागले असून येत्या काही दिवसांत इंधन टंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील अनेक पेट्रोल पंपचालकांना तेल कंपन्यांकडून मेसेज पाठवण्यात आलेत.

या मेसेजमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आगाऊ रक्कम जमा करण्यास सांगितलं आहे. यापूर्वी पंपचालकांना सात ते आठ दिवसांचे क्रेडिट दिले जात होते. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे.

LPG Crisis in Maharashtra:
इराणचं धाड-धाड, उडवून टाकलं थाड, अमेरिकन संरक्षण प्रणाली इस्रायलमध्ये फेल

पश्चिम आशियातील तणावामुळे नैसर्गिक वायूचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.त्याचा परिणाम भारतावर होतोय. पुण्यात सीएनजी आणि एलपीजी गॅसच्या उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होत आहे. काही ठिकाणी गॅस सिलेंडर मिळण्यास उशीर होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात इराण-इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामुळे एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर वितरित करू नये अशा सूचना गॅस एजन्सीना गॅस कंपनीने दिल्या आहेत.

LPG Crisis in Maharashtra:
मुस्लीम देशांवर कुणाचे हल्ले? इराणचं स्पष्टीकरण, आखाती देशात खळबळ

तसेच घरगुती गॅस सिलेंडरला १ महिना पूर्ण झाल्याशिवाय दुसरा सिलेंडर देऊ नयेत. रत्नागिरी गॅस कंपनीमध्ये तीन दिवस पुढील एवढा गॅसचा साठा शिल्लक आहे. भविष्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा जाणवू शकतो, त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरवाल्यांनी गॅस जपून वापरावा. असं गॅस एजन्सीने ग्राहकांना आवाहन केले आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य कुटुंबांवर आर्थिक भार वाढलाय. गॅस, पेट्रोल, डिझेल आणि किराणा माल यांचे दर सतत वाढत आहेत. मात्र उत्पन्न त्याच प्रमाणात वाढत नाही. गॅस एजन्सीकडे वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारीही काही नागरिकांनी केल्या आहेत.

पुण्यात कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत अचानक १५० ते २०० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे. अनेक हॉटेल्समध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसचा पुरवठा अनियमित झाला आहे. गॅस पुरवठा कधी सुरळीत होईल याबाबत स्पष्ट माहिती नसल्यामुळे उद्योग क्षेत्रातही चिंतेचे वातावरण आहे.

पुण्यातील स्मशानभूमीतही अडचणी

गॅस टंचाईचा परिणाम आता पुण्यातील अंत्यसंस्कार व्यवस्थेवरही दिसू लागला आहे. सदाशिव पेठ परिसरातील वैकुंठ स्मशानभूमीत गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या सध्या बंद ठेवाव्या लागल्या आहेत. गॅस पुरवठा थांबल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या दाहिन्या वापरात नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com