अमेरिका- इस्त्रायल विरुद्ध इराण युद्धाने मध्यपूर्वेत आगडोंब उसळलाय.... इराणने आखाती देशातील अमेरिकी लष्करी तळ लक्ष्य केलेत... एवढंच नाही तर सौदी अरेबिया, तुर्की, ओमान, अझरबैजान या मुस्लीम देशांवरही भीषण हल्ले झाल्याचं समोर आलंय.. त्यामुळे आता तणाव वाढून मध्य पूर्वेत युद्धाची आग आणखीच भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.. पण इराणने मात्र मुस्लीम देशांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केल्याचे आरोप फेटाळून लावलेत...
अझरबैजान, तुर्की, सौदी अरेबिया, ओमान आणि सायप्रस या देशांवर इराणने हल्ले केले नाहीत... आम्ही या सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करतो. मुस्लीम देशांमधील संबंध बिघडवण्यासाठी इस्त्रायल खोट्या बातम्या पसरवत आहे.. या खोट्या बातम्या म्हणजे फॉल्स फॉग आहे.
खरं तर अमेरिका आणि इस्त्रायलने एकत्रित इराणवर हल्ला केला... आणि मध्य पूर्वेत युद्धाला तोंड फुटलं.. त्यानंतर इराणने आखाती देशातील अमेरिकेचे लष्करी तळ उद्ध्वस्त करायला सुरुवात केली.. त्यामुळे युद्धाचा भडका आणखीच उडाला... हे सगळं सुरु असतानाच शेजारील मुस्लीम देशांवर इराणने हल्ला केल्याचा संशय व्यक्त कऱण्यात आला होता..
अझरबैजानच्या नखचिवान विमानतळाजवळ 2 ड्रोनने हल्ला केला... हा हल्ला इराणच्या दिशेने आल्याचा संशय व्यक् केला जात होता.. त्यानंतर अझरबैजानने इराणचा निषेध केला होता...
एवढंच नाही तर तुर्कीच्या दिशेनं जात असेललं मिसाईल नाटो देशांनी पाडलं... त्यानंतर तुर्की, सौदी अरेबियाने इराणचं नाव घेत निषेध नोंदवला...
याच दम्यान सायप्रसमधील ब्रिटीश लष्करी तळावरही ड्रोन हल्ला झाला.. हा हल्लाही इराणने केल्याचा संशय व्यक्त केला जात होता... त्यामुळे ब्रिटननेही इराणला गंभीर इशारा दिला..
तर ओमानमध्येही ड्रोन हल्ले झाले... तेलाचं जहाज लक्ष्य करण्यात आलं... त्याचाही ओमानने निषेध नोंदवला होता..
हे सगळे आरोप इराणने फेटाळून लावले... त्यामुळे अमेरिका आणि इस्त्रायलच इराणविरोधात मुस्लीम देशांनी युद्धात उतरावं, यासाठी ही खेळी करत आहे की इराणशी असलेली दुश्मनी काढण्यासाठी तिसराच देश हात धुवून घेत आहे.... असाच प्रश्न आता निर्माण झालाय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.