Pune Crime: पुणे हादरले! महापालिका कर्मचाऱ्याची घरासमोर हत्या, अनैतिक संबंधाच्या संशयावरून जागीच संपवलं

Pune Corporation Employee Killed Case: पुण्यामध्ये महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्याची घरासमोर हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधाच्या संशयावरून ही घटना घडली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
Pune Crime: पुणे हादरले! महापालिका कर्मचाऱ्याची घरासमोर हत्या, अनैतिक संबंधाच्या संशयावरून जागीच संपवलं
Pune Corporation Employee Killed CaseSaam Tv
Published On

Summary:

  • पुण्यात महापालिका कर्मचाऱ्याची हत्या

  • अनैतिक संबंधाच्या संशयावरून करण्यात आली हत्या

  • धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं

  • या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली

पुण्यामध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. पुणे महापालिका कर्मचाऱ्याची भरचौकात धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याला जागीच संपवण्यात आले. रविवारी पुण्यातल्या कात्रजरमधील आंबेगाव पठार याठिकाणी ही घटना घडली. या घटनेमुळे कात्रज परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली. दीपक अशोक क्षीरसागर (३८ वर्षे) अस हत्या करणाऱ्या आलेल्या व्यक्तीचे नाव होते. दीपक हे आंबेगावच्या इंद्रायणीनगरमधील समर्थ हाइट्स या इमारतीमध्ये कुटुंबीयांसोबत राहत होते. अनैतिक संबंधाच्या संशयावरून धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या आली. रविवारी रात्री दोघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत जागीच संपवलं.

सिद्धार्थ संजय हातुरे (वय २६ वर्षे) )आणि ऋषिकेश मनोहर गायकवाड (वय २९ वर्षे) अशी आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपी आंबेगाव येथील इंद्रायणी नगरमध्ये राहणारे आहेत. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, दीपक क्षीरसागर हे पुणे महापालिकेत पाणीपुरवठा विभागात काम करत होते. रविवारी रात्री जेवण केल्यानंतर ते रात्री सव्वानऊच्या सुमारास इंद्रायणीनगर कमानीजवळ त्यांच्या घरासमोर फेरफटका मारत होते.

Pune Crime: पुणे हादरले! महापालिका कर्मचाऱ्याची घरासमोर हत्या, अनैतिक संबंधाच्या संशयावरून जागीच संपवलं
Crime: दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले, घरात घुसून मायलेकीची हत्या; नंतर आरोपीने उचललं टोकाचं पाऊल

त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी अनैतिक संबंधाचा संशयावरून दीपक यांच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने दीपक यांचा जास्त रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत फरार झालेल्या दोन्ही आरोपींना अटक केली. हे हत्याकांड अनैतिक संबंधाच्या संशयातून झाले असल्याची माहिती समोर आली.

Pune Crime: पुणे हादरले! महापालिका कर्मचाऱ्याची घरासमोर हत्या, अनैतिक संबंधाच्या संशयावरून जागीच संपवलं
Pune Crime: प्रेमसंबंधातून १६ व्या वर्षी लग्न, दोन वर्षांनी तरुणीचा मृत्यू; जेवणातून विष देऊन मारल्याचा आई-वडिलांचा आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com