Solapur : बोरामणी हत्याकांडातील मास्टरमाईंडने रचला होता देश सोडायचा प्लॅन; पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या, 'त्या' एका चुकीनं घात झाला

Solapur Tripal Murder Case News : सोलापूर जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी शंकर मस्के याला महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या संयुक्त कारवाईत बांगलादेश सीमेवरून अटक करण्यात आली. पुढील तपास सुरु आहे.
BORAMANI TRIPLE MURDER CASE: MAIN ACCUSED SHANKAR MASKE ARRESTED NEAR BANGLADESH BORDER
BORAMANI TRIPLE MURDER CASE: MAIN ACCUSED SHANKAR MASKE ARRESTED NEAR BANGLADESH BORDERSaam Tv
Published On
Summary
  • बोरामणी तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी शंकर मस्के अखेर अटकेत

  • महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आरोपी पकडला गेला

  • फास्टॅग आणि तांत्रिक तपासामुळे आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य झाले

  • आरोपी शंकर मस्केला १४ मेपर्यंत पोलिस कोठडी

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी शंकर दत्तात्रय मस्के ऊर्फ पप्पू याला अखेर पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शंकरला बांगलादेश सीमेवरून ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यानंतर शंकर हा राज्याबाहेर फरार झाला होता आणि बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शंकर मस्के हा महाराष्ट्रातून तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल असा तब्बल दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून सीमावर्ती भागात पोहोचला होता. आरोपीने वापरलेल्या कारच्या फास्टॅगचा मागोवा घेण्यात आला. तसेच सीडीआर विश्लेषण आणि लाईव्ह एलबीएस तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचे लोकेशन शोधण्यात आले.

BORAMANI TRIPLE MURDER CASE: MAIN ACCUSED SHANKAR MASKE ARRESTED NEAR BANGLADESH BORDER
Mumbai : मुंबई हादरली! ६ वर्षाच्या मुलाला रिकाम्या खोलीत न्यायचा, अश्लील कृत्य करायचा; नामंकित शाळेच्या शिपायाला बेड्या

गुरुवारी मध्यरात्री आरोपी शंकरला कडेकोट बंदोबस्तात सोलापुरात आणण्यात आले. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ मेपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील इतर आरोपी राणी शंकर मस्के, दीक्षा शंकर मस्के, धीरज शंकर मस्के, सचिन शिवाजी वाघमारे आणि सूरज महादेव मोरे यांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

BORAMANI TRIPLE MURDER CASE: MAIN ACCUSED SHANKAR MASKE ARRESTED NEAR BANGLADESH BORDER
Shocking : २१ वर्षाच्या तरूणीला बॉयफ्रेंडने जिवंत जाळले, कुटुंबियांनीही केली मदत, कारण वाचून थरकाप उडेल

२ मे रोजी मध्यरात्री बोरामणी येथे शेतीच्या वादातून आणि पैशांच्या व्यवहाराच्या कारणावरून हा तिहेरी खून घडला होता. आरोपी शंकर मस्के याने उसने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून भावजय गायत्री, पुतणी प्रियांका आणि पुतण्या शिवराज यांची हत्या केल्याचा आरोप आहे. याबाबत गायत्री यांचे भाऊ दिलीप चांदोरे यांनी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

BORAMANI TRIPLE MURDER CASE: MAIN ACCUSED SHANKAR MASKE ARRESTED NEAR BANGLADESH BORDER
Shocking : नातीला पोटमाळ्यावर लपवलं, लैंगिक अत्याचार करताना लोकांनी पाहिलं, नराधम आजोबाला पोलिसात दिलं, पर्वती भागातील घटनेत काय घडलं?

दरम्यान, शंकर मस्के हा शेतीमालाच्या इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसायात कार्यरत होता. या व्यवसायातूनच त्याची पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीशी ओळख झाली होती. त्याच मित्राच्या मदतीने तो पश्चिम बंगालमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस तपासात शंकरने गुन्ह्याची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com