Shocking : नातीला पोटमाळ्यावर लपवलं, लैंगिक अत्याचार करताना लोकांनी पाहिलं, नराधम आजोबाला पोलिसात दिलं, पर्वती भागातील घटनेत काय घडलं?

Pune Crime News : पुण्यातील पर्वती पायथा परिसरात ९ वर्षांच्या मुलीवर तिच्याच आजोबांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस आला असून नागरिकांनी संतप्त होऊन आंदोलन छेडले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
PUNE SHOCKING CRIME: GRANDFATHER ASSAULTS 9-YEAR-OLD GIRL IN PARVATI AREA
PUNE SHOCKING CRIME: GRANDFATHER ASSAULTS 9-YEAR-OLD GIRL IN PARVATI AREASaam Tv
Published On
Summary
  • पुण्यातील पर्वती परिसरात ९ वर्षीय मुलीवर अत्याचार

  • आरोपी स्वतःचा आजोबा

  • शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे घटना उघड

  • संतप्त नागरिकांचे ठिय्या आंदोलन

  • पोलिसांकडून आरोपी अटकेत, तपास सुरू

पुण्यातील नरसापूर प्रकरण ताजे असताना शहरातील पर्वती पायथा परिसरात मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नऊ वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच आजोबांनी लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे अत्याचारानंतर आरोपीने मुलीला पोट माळ्यावर लपवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी करत रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे आई-वडील घराबाहेर गेले असताना आरोपी आजोबाने स्वतःच्या नातीवर बलात्कार केला. घरातून मुलीच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या एका महिलेला संशय आला. तिने तत्काळ घराच्या फटीतून डोकावून पाहिले असता, मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न सुरू असल्याचे तिच्या निदर्शनास आले. यानंतर तिने इतर शेजाऱ्यांना बोलावून परिस्थितीची माहिती दिली.

PUNE SHOCKING CRIME: GRANDFATHER ASSAULTS 9-YEAR-OLD GIRL IN PARVATI AREA
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 'नो क्लिक', सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल होणार

घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी आरोपीच्या घराबाहेर मोठी गर्दी केली आणि दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने दार उघडण्यास नकार दिला. काही वेळानंतर त्याने मुलीला घरातील पोटमाळ्यावर लपवून ठेवत दार उघडले. हा प्रकार उघड होताच संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून त्याला मारहाण केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

PUNE SHOCKING CRIME: GRANDFATHER ASSAULTS 9-YEAR-OLD GIRL IN PARVATI AREA
Shocking : २१ वर्षाच्या तरूणीला बॉयफ्रेंडने जिवंत जाळले, कुटुंबियांनीही केली मदत, कारण वाचून थरकाप उडेल

आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, पीडित मुलीला सुरक्षित बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित कायद्यांनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेनंतर नागरिकांनी महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com