Shocking : २१ वर्षाच्या तरूणीला बॉयफ्रेंडने जिवंत जाळले, कुटुंबियांनीही केली मदत, कारण वाचून थरकाप उडेल

Uttar Pradesh Crime News : बुलंदशहरमध्ये प्रेमसंबंधातील वादातून २१ वर्षीय कशिश मीनाला पेटवून दिल्याचा आरोप; ९०% भाजल्यानंतर मृत्यू. आरोपी अटकेत, कुटुंबीयांची न्यायाची मागणी.
BULANDSHAHR BURN CASE: 21 YEAR OLD GIRL DIES AFTER LOVE DISPUTE SHOCKING CRIME
BULANDSHAHR BURN CASE: 21 YEAR OLD GIRL DIES AFTER LOVE DISPUTE SHOCKING CRIMESaam Tv
Published On
Summary
  • बुलंदशहरमध्ये प्रेमसंबंधातून भीषण जळीतकांडाची घटना

  • २१ वर्षीय कशिश मीना ९०% भाजल्यानंतर मृत्यू

  • प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप

  • आरोपी अटकेत; कुटुंबीयांकडून न्यायाची जोरदार मागणी

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. प्रेमसंबंधातील वादातून २१ वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकराने आणि त्याच्या कुटुंबीयांनी पेटवून दिल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत तरुणी ९० टक्के भाजली होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मृत्यूशी झुंज देणाऱ्या कशिश मीनाची प्राणज्योत मालवली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तिच्या कुटुंबियांनी न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कशिश मीना शिकारपूरमधील मूर्ती विहार परिसरात राहत होती. गेल्या तीन वर्षांपासून तिचे त्याच गावातील आशिष नावाच्या २४ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते. सुरुवातीला दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या नात्याला मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतर आशिषने दुसऱ्या मुलीशी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतल्याचे कशिशला सांगितल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला.

BULANDSHAHR BURN CASE: 21 YEAR OLD GIRL DIES AFTER LOVE DISPUTE SHOCKING CRIME
Election : पश्चिम बंगालमध्ये २८५ मतदान केंद्रांवर होणार फेरमतदान, असे असेल वेळापत्रक

२५ एप्रिल रोजी या वादाचे रूपांतर भीषण घटनेत झाले. कशिशने आशिषला जाब विचारला असता त्यांच्यात तीव्र भांडण झाले. याच दरम्यान, आशिष आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिच्यावर पेट्रोल ओतून आग लावल्याचा आरोप आहे. गंभीर भाजलेल्या अवस्थेत तिला तातडीने शिकारपूरच्या सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले, त्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगत पुढील उपचारासाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात रेफर केले.

BULANDSHAHR BURN CASE: 21 YEAR OLD GIRL DIES AFTER LOVE DISPUTE SHOCKING CRIME
Shocking : वहिनीसोबतचं अफेअर पत्नीला समजलं; पतीने प्रेयसीच्या मदतीने केली पत्नीची हत्या, थरारक घटनेने सर्वजण सुन्न

सफदरजंग रुग्णालयात आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या माहितीनुसार, ती ९० टक्क्यांहून अधिक भाजली होती. मृत्यूपूर्वी कशिशने शिकारपूरचे एसडीएम अरुण वर्मा यांच्या उपस्थितीत आपला जबाब नोंदवला होता, जो न्यायालयात सादर केला जाणार आहे.

BULANDSHAHR BURN CASE: 21 YEAR OLD GIRL DIES AFTER LOVE DISPUTE SHOCKING CRIME
Shocking : परीक्षेत कमी गुण मिळाले, ११ वीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल; वडिलांची बंदूक घेतली अन्...

या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. कशिशचे वडील दीपक कुमार यांनी “माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे,” अशी भावना व्यक्त केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात आशिषसह त्याचा भाऊ विवेक कुमार आणि इतर तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी आशिषला अटक करण्यात आली असून, निष्काळजीपणाबद्दल स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com