Mumbai : मुंबई हादरली! ६ वर्षाच्या मुलाला रिकाम्या खोलीत न्यायचा, अश्लील कृत्य करायचा; नामंकित शाळेच्या शिपायाला बेड्या

Mumbai Crime News : गोवंडीतील नामांकित शाळेत ६ वर्षीय विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून ४५ वर्षीय शिपायाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
GOVANDI SCHOOL CASE: PEON ARRESTED UNDER POCSO FOR ALLEGED MISCONDUCT WITH 6-YEAR-OLD STUDENT
GOVANDI SCHOOL CASE: PEON ARRESTED UNDER POCSO FOR ALLEGED MISCONDUCT WITH 6-YEAR-OLD STUDENTSaam Tv
Published On
Summary
  • गोवंडीतील शाळेत ६ वर्षीय विद्यार्थ्यासोबत गैरवर्तनाचा आरोप

  • आरोपी शिपाई राजेश महाकाळ याला पोलिसांनी अटक केली

  • आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

  • विद्यार्थ्याने पालकांना सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस

  • शाळेतील सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित

  • गोवंडी पोलिसांकडून सखोल तपास सुरू

मुंबईतील गोवंडी परिसरातील एका नामांकित शाळेत बदलापूर अत्याचार प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. शाळेत काम करणाऱ्या ४५ वर्षीय शिपायाने ६ वर्षीय विद्यार्थ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित शिपायाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश महाकाळ हा संबंधित शाळेत शिपाई म्हणून कार्यरत होता. मागील वर्षभरापासून तो विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाळेतील रिकाम्या खोलीत नेऊन आरोपी विद्यार्थ्यासोबत अयोग्य कृत्य करत असल्याचे तपासात समोर येत आहे. दरम्यान, पीडित विद्यार्थ्याने अखेर हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलाकडून घडलेला प्रकार ऐकताच पालकांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने गोवंडी पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी राजेश महाकाळ याच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

GOVANDI SCHOOL CASE: PEON ARRESTED UNDER POCSO FOR ALLEGED MISCONDUCT WITH 6-YEAR-OLD STUDENT
Shocking : नातीला पोटमाळ्यावर लपवलं, लैंगिक अत्याचार करताना लोकांनी पाहिलं, नराधम आजोबाला पोलिसात दिलं, पर्वती भागातील घटनेत काय घडलं?

या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गतही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या आरोपीची चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

GOVANDI SCHOOL CASE: PEON ARRESTED UNDER POCSO FOR ALLEGED MISCONDUCT WITH 6-YEAR-OLD STUDENT
Shocking : भरमंडपात रक्ताचा सडा, मेहुणीच्या लग्नात भाऊजीची हत्या, साडूनेच केला घात

गोवंडी पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून शाळेतील इतर कर्मचारी, शिक्षक तसेच प्रशासनाचीही चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बदलापूरमधील घटनेनंतर राज्यभरात शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असताना, गोवंडीतील ही घटना समोर आल्याने पुन्हा एकदा शालेय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पालकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com