

मुंबई-नागपूर प्रवास सुसाट होणार
समृद्धी महामार्ग कोस्टल रोडशी जोडणार
८ पदरी नवीन मार्ग बांधणार
मुंबई ते नागपूर हा प्रवास समृद्धी महामार्गामुळे वेगवान झाला आहे. परंतु आता हा प्रवास आणखी जलद आणि सुखकर होणार आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरुन थेट दक्षिण मुंबईत जाता येणार आहे. समृद्धी महामार्गावरुन दक्षिण मुंबईत जाण्यासाठी खूप वाहतूक कोंडी होते. आमणे ते दक्षिण मुंबईत जाण्यासाठी दोन तास लागतात. आता प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार आहे.
समृद्धी महामार्गावरुन थेट दक्षिण मुंबई गाठता येणार
आता समृद्धी महामार्गावरुन थेट दक्षिण मुंबईसाठी नवीन ८ पदरी रस्ता बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १८ किमी लांबीचा हा रस्ता बांधणार आहे.हा मार्ग कोस्टल रोडशी जोडला जाणार आहे. या रोडमुखे नागपूर ते दक्षिण मुंबई हा प्रवास खूप कमी कालावधीत होणार आहे.
समृद्धी महामार्ग कोस्टल रोडशी जोडण्यासाठी नवीन मार्ग बांधण्यात येणार आहे. यादृष्टीने चाचपणी सुरु झाली आहे. मुंबई-वडोदरा महामार्ग, ठाणे सागरी किनारा मार्ग आणि समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. पुढे भविष्यात हा मार्ग सागरी सेतूद्वारे मुंबईत पोहचता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकाम महामडंळाच्या समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते आमणे प्रवास फक्त ७ तासात करता येतो. यापुढे वरळी, वांद्रे, दहीसर या ठिकाणी जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.यासाठी जवळपास २ तास लागतो. यामुळेच हा नवीन १८ किमी लांबीचा मार्ग बांधणार आहे.
हा रस्ता नेमका कधी आणि कुठून सुरु होईल, याबाबत कोणीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प एमएसआरडीसीकडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी २००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.