मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! AC लोकलबाबत रेल्वेमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा; जाणून घ्या पहिली ट्रेन कधी सुरू होणार

AC Local Trains in Mumbai: रेल्वेने २३८ नवीन एसी लोकल रेकच्या निर्मितीचे आदेश दिले आहेत. पहिली नवीन एसी लोकल २०२७ मध्ये सेवेत दाखल होणार असून २०३० पर्यंत सर्व गाड्यांचा पुरवठा पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
Mumbai Local: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!
Mumbai Local Train NewsSaam Tv
Published On

Mumbai new AC local train first train : मुंबई उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास आता अधिक आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांसाठी एकूण २३८ नवीन वातानुकूलित (AC) लोकल रेकच्या निर्मितीचे आदेश दिले असून, या मालिकेतील पहिली नवीन एसी लोकल २०२७ मध्ये मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. तर २०३० पर्यंत सर्व २३८ एसी लोकल गाड्यांचा पुरवठा पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.

सध्या दररोज धावणाऱ्या सुमारे ३ हजार २०० लोकल फेऱ्या आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या माध्यमातून २०३० पर्यंत ३ हजार ५०० पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक लोकलमध्ये स्वयंचलित (ऑटोमॅटिक) दरवाजे बसविण्याचा महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला आहे.

Mumbai Local: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!
Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास बदलणार! एसी लोकलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वाचा काय आहे प्लान

२३८ एसी लोकलची निर्मिती आणि सुरक्षा

रेल्वे बोर्डाने मंजूर केलेल्या २३८ एसी लोकलच्या निर्मितीसाठी 'मॉडर्न कोच फॅक्टरी' आणि 'रेल कोच फॅक्टरी' यांच्यात समन्वय साधला जाणार आहे. २०२७ मध्ये पहिली गाडी उपलब्ध झाल्यानंतर २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व २३८ रेक उपलब्ध करून दिले जातील. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि गतीमान करण्याला रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे वैष्णव यांनी नमूद केले.

Mumbai Local: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!
Today's Horoscope : कृष्णकृपा! गोकुळाष्टमीला 'या' ७ राशींचे नशीब चमकणार; धनलाभ आणि प्रमोशनचा योग

१८ हजार कोटींचे प्रकल्प आणि फलाटांचा विस्तार

मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढविण्यासाठी सध्या सुमारे १८ हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे वेगाने सुरू आहेत.

जोगेश्वरी: पाच नवीन फलाट आणि दोन पिट लाइन.

दादर: एक अतिरिक्त फलाट.

वसई रोड परिसर: सहा फलाट, तीन पिट लाइन आणि पाच स्टेबलिंग लाइन.

लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT): चार नवीन फलाट आणि दोन पिट लाइन.

याशिवाय, अधिक प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी अनेक फलाटांचा विस्तार करून ते १५ डब्यांच्या गाड्यांसाठी सक्षम केले जात आहेत.

Mumbai Local: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!
'NCMC' कार्डमुळे ST चा स्वस्त प्रवास महागात पडतोय, सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड

समृद्धी महामार्गालगत मालवाहतूक मार्ग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार समृद्धी महामार्गालगत पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गांचे (Dedicated Freight Corridors) आरेखन करण्यात येणार आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक परिसरातील रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होऊन राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला मोठा वेग मिळणार आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत ४५५ किलोमीटरचे पिअर्स आणि ३६५ किलोमीटरचे व्हायाडक्ट पूर्ण झाले आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) ते ठाणे दरम्यानच्या भूमिगत मार्गामध्ये भारतातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याचे काम विक्रोळी आणि घणसोली येथून टनेल बोअरिंग मशीनद्वारे (TBM) सुरू आहे. यासोबतच मुंबई-पुणे बुलेट ट्रेन कॉरिडॉर हा महाराष्ट्राच्या भविष्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com