Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास बदलणार! एसी लोकलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वाचा काय आहे प्लान

Mumbai AC Local udpate : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकारने मुंबईसाठी २३८ नव्या एसी लोकल ट्रेनला मंजुरी दिली आहे. नव्या उत्पादन पद्धतीमुळे २०२७ पर्यंत पहिली एसी लोकल रुळावर आणण्याचे नियोजन आहे.
Mumbai AC Local udpate
Mumbai AC Local udpateSaam TV Marathi
Published On

238 new AC local trains for Mumbai : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक गतिमान आणि आरामदायी करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा अधिक अद्ययावत करण्यासाठी केंद्राकडून तब्बल २३८ नव्या एसी लोकल ट्रेन्सला मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या प्रकल्पांतर्गत २०२७ पर्यंत पहिली एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार मानले आहेत.

मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) निविदा प्रक्रियेचा अवलंब करण्याऐवजी २३८ एसी लोकल ट्रेन रेक्सची खरेदी जलदगतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (MUTP)-3 आणि MUTP-3A अंतर्गत सप्टेंबर २०२५ मध्ये काढण्यात आलेल्या २१,६४६ कोटी रुपयांच्या निविदेमध्ये संबंधित देखभाल सुविधांचाही समावेश होता. एकूण २३८ रेक्सपैकी, MUTP-3 अंतर्गत ४७ आणि MUTP-3A अंतर्गत १९१ रेक्सचे नियोजन करण्यात आले होते.

Mumbai AC Local udpate
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹३००० जमा होणार, तारीखही आली समोर, महत्त्वाची अपडेट
मुंबई लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबई लोकलसाठी भारत सरकारने २३८ (238) एसी (AC) ट्रेन्स मंजूर केल्या आहेत. त्यांच्या खरेदीसाठी (procurement) पूर्वी जी पद्धत वापरली जात होती, त्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. संपूर्ण खरेदी प्रक्रिया २०३० (2030) पर्यंत लांबत होती, जे आम्हाला मान्य नव्हते. म्हणूनच आज एक नवीन निर्णय घेण्यात आला आहे. आता एका नव्या पद्धतीने, भारत सरकारच्या तीन उत्पादन युनिट्समध्ये (Production Units) — ICF, RCF आणि MCF मध्ये यांचे उत्पादन केले जाईल. यामुळे २०२७ (2027) पर्यंत पहिली एसी लोकल रुळांवर येऊ शकेल.
अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे मंत्री
Mumbai AC Local udpate
५,००० कोटींत शिवसेना विकली! आयोग अन् अमित शाहांवर ठाकरेंच्या खासदाराची गंभीर टीका; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तार होत असताना एसी लोकलचा हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन कॉरिडॉर, अतिरिक्त रेल्वे मार्ग, १५ डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि यार्डची पुनर्रचना या प्रकल्पांमध्ये सुमारे २२,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. एमयूटीपी-२ आणि एमयूटीपी-३ अंतर्गत अनेक क्षमता वाढीची कामे २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

Mumbai AC Local udpate
मुंबईच्या २४ वर्षीय स्टार बायकरचा मृत्यू, १००० किमी दूर झाला भयंकर अपघात; बातमी ऐकून कुटुंबीयांना मोठा धक्का

४७ एमयूटीपी-३ एसी लोकल गाड्या २०२१-२२ मध्ये आणि एमयूटीपी-३ए अंतर्गत १९१ गाड्या २०२३-२४ पासून येण्यास सुरुवात होणे अपेक्षित होते. पण निविदा अंतिम करण्यास वारंवार झालेल्या विलंबामुळे ठरलेल्या कालावधीपेक्षा उशिर झाला. संभाव्य निविदाकारांनी सूचित केले आहे की, त्यांना प्रथम उत्पादन सुविधा स्थापित कराव्या लागतील, त्यामुळे मालिका उत्पादन सुरू करण्यासाठी त्यांना सुमारे तीन वर्षे लागतील. यामुळे गाड्यांची पहिली खेप २०३३-३४ पर्यंतच वितरित होणे शक्य होण्याची शक्यता आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com