मुंबईच्या २४ वर्षीय स्टार बायकरचा मृत्यू, १००० किमी दूर झाला भयंकर अपघात; बातमी ऐकून कुटुंबीयांना मोठा धक्का

Mumbai Biker Riddhi Thakkar Accident : मुंबईतील २४ वर्षीय बायकर रिद्धी ठक्कर हिचा छत्तीसगडमध्ये भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेत रिद्धीचा मृत्यू झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Mumbai Biker Riddhi Thakkar Death
Mumbai Biker Riddhi Thakkar DeathSaam TV (AI Image)
Published On

Mumbai Biker Riddhi Thakkar Death : बोरीवलीतील प्रसिद्ध महिला बायकर रिद्धी ठक्कर हिचा छत्तीसगडमध्ये झालेल्या दुर्दैवी रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. रायडिंगची प्रचंड आवड असणारी २४ वर्षीय रिद्धी ठक्कर बोरीवलीवरून छत्तीसगडच्या बस्तर भागामध्ये बाईक ट्रिपसाठी गेली होती. पण एका अपघातात तिचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला.

घरापासून १,००० किलोमीटर दूर असताना महामार्गावर एका अज्ञात वाहनाने तिच्या बाईकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात रिद्धीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारा वाहनचालक गाडीसह पसार झाला असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. रिद्धीच्या अशा अचानक जाण्याने मुंबईतील रायडिंग कम्युनिटी आणि बोरीवली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Mumbai Biker Riddhi Thakkar Death
EPFO New Rules : नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO चे 'हे' ५ नवीन नियम बदलले; तुमचे पैसे अडकणार नाहीत

बुधवारी धमतरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ३० वरील मार्कटोला घाटाजवळ रिद्धीच्या बाईकला एका ट्रेलरने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिद्धीला रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुंबईतील कांदिवली पश्चिम येथे राहणाऱ्या रिद्धी ठक्कर हिला बाईकिंग आणि लांब पल्ल्याच्या प्रवासाची प्रचंड आवड होती. २३ जणांच्या ग्रुपसोबत रिद्धी रायपूरहून बस्तरमधील कांकरेरकडे प्रवास करत होती. त्याचवेळी काळाने घाला घातला. अपघातानंतर ट्रेलरचा चालक वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ट्रेलरची ओळख पटवण्यासाठी जवळपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

Mumbai Biker Riddhi Thakkar Death
...तर टॅक्सी-रिक्षाचा थेट परवाना रद्द होणार, सरकारचा ऐतिहासिक निर्णय; काय आहे मोटर वाहन कायदा?

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मार्कटोला घाटाजवळ रिद्धीच्या बाईकची एका ट्रेलरला धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की ती रस्त्यावर पडली आणि गंभीर जखमी झाली. तिच्या सोबत्यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सर्वप्रथम चरमा आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने धमतरी येथील श्रीराम रुग्णालयात हलवण्यात आले, पण डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com