EPFO new PF withdrawal rules for salaried employees : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पगारदार कर्मचार्यांच्या सुविधेसाठी आणि डिजिटल प्रक्रियेला गती देण्यासाठी काही महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. PF काढणे, UAN ॲक्टिव्हेशन आणि खाते ट्रान्सफरबाबत हे नवीन नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. यातील काही बदल आधीच लागू करण्यात आले आहेत, तर इतर बदल ही प्रक्रिया डिजिटल करण्याच्या दिशेने उचललेली पावले आहेत.
अंतिम पीएफ काढण्यासाठी 'ऑटो-सेटलमेंट':
याआधी फक्त ५ लाख रुपयांपर्यंतच्या ॲडव्हान्स क्लेमसाठीच (अॅडव्हान्स पीएफ) ऑटो-सेटलमेंट सुविधा उपलब्ध होती. आता EPFO ने ही सुविधा अंतिम पीएफ काढण्याच्या प्रक्रियेतही लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तुमचे पीएफचे पैसे तात्काळ जमा होतील.
केंद्रीय भविष्य निधी आयुक्त रमेश कृष्णमूर्ती यांनी मे महिन्यात एका कार्यक्रमात सांगितले की, आतापर्यंत केवळ ५ लाख रुपयांपर्यंतच्या आगाऊ पीएफ दाव्यांवरच ऑटो-सेटलमेंट पद्धतीने प्रक्रिया केली जात होती, परंतु आता ही सुविधा अंतिम पैसे काढण्याच्या प्रक्रियेसाठीही विस्तारित केली जाईल.
UAN ॲक्टिव्हेशन आता 'उमंग' (UMANG) ॲपवर:
कर्मचारी आता थेट 'युनिफाइड मेंबर पोर्टल'वरून त्यांचा UAN ॲक्टिव्हेट किंवा जनरेट करू शकणार नाहीत. ही सेवा आता 'उमंग' (UMANG) ॲपवर शिफ्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये फेस ऑथेंटिकेशन (Face Authentication) अनिवार्य करण्यात आले आहे.
नोकरी बदलल्यास पीएफ ऑटो-ट्रान्सफर:
नोकरी बदलल्यावर तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम हस्तांतरित करणे अत्यंत सोपे झाले आहे. जर तुमचा UAN आधारशी लिंक असेल आणि KYC पूर्ण असेल, तर नवीन कंपनीत जॉईन झाल्यावर पीएफ खाते आपोआप (Auto Transfer) ट्रान्सफर होईल. आता जुन्या किंवा नव्या कंपनीच्या आणि EPFO च्या फेऱ्या मारून स्वतंत्र फॉर्म भरण्याची कटकट संपली आहे.
आधी पीएफ खाते हस्तांतरणासाठी जुन्या आणि नवीन नियोक्त्यांची, तसेच ईपीएफओ कार्यालयाची मंजुरी आवश्यक होती.
क्लेम फक्त १ ते २ दिवसांत मंजूर:
EPFO ने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश नवीन पीएफ क्लेम आता एका ते दोन दिवसांत मंजूर (Settle) केले जातील. तसेच EPS (पेन्शन) क्लेमसाठी २० दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत काम न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याकडून विलंब भरपाई म्हणून वर्षाला १२% व्याज वसूल केले जाऊ शकते.
UPI आणि ATM द्वारे PF काढण्याची सुविधा
पीएफ क्लेम सेटलमेंटची सुविधा लवकरच भीम ॲपद्वारे उपलब्ध होईल. त्यामुळे क्लेमची रक्कम थेट सदस्यांच्या यूपीआय-लिंक्ड बँक खात्यांमध्ये जमा केली जाईल. कृष्णमूर्ती यांनी जुलैमध्ये घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी पुढील महिन्यात केली जाईल. याबद्दल अधिक माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण ही सुविधा पुढील काही दिवसांत सुरू होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे पीएफमधून पैसे काढणे अधिक सोपे आणि जलद होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.