Mumbai Goa Highway : कोकणवासीयांचा प्रवास होणार सुसाट! मुंबई गोवा महामार्ग ९० टक्के पूर्ण, फक्त या ठिकाणाचे काम सुरू

Mumbai Goa Highway Work : मुंबई-गोवा महामार्गाचे ९०% काम पूर्ण झाल्याचा खासदार सुनील तटकरे यांचा दावा. ३१ मेपूर्वी प्रकल्प पूर्णत्वाकडे जाणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला असून बायपास आणि उड्डाणपूल कामांना वेग.
MUMBAI GOA HIGHWAY 90 PERCENT COMPLETE TATKARE CLAIMS PROGRESS
MUMBAI GOA HIGHWAY 90 PERCENT COMPLETE TATKARE CLAIMS PROGRESSSaam tv
Published On
Summary
  • मुंबई-गोवा महामार्गाचे ९०% काम पूर्ण

  • ३१ मेपूर्वी प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता

  • उड्डाणपूल आणि बायपास कामांना वेग

  • कोकणातील प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबई गोवा महामार्गाचे काम ९० टक्के पूर्ण झाले. या महामार्गाच्या कामाबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली. महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. “मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण असल्याबाबत मी सहमत नाही. सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे यांनी महामार्गावरील प्रलंबित कामांबाबत सविस्तर माहिती दिली. कोलाड आणि नागोठणे येथील उड्डाणपुलांची कामे सध्या सुरू असून, इंदापूर आणि माणगाव बायपासच्या कामालाही गती मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले. “३१ मेपूर्वी बायपासची काही कामे वगळता उर्वरित महामार्गाचे काम पूर्ण होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MUMBAI GOA HIGHWAY 90 PERCENT COMPLETE TATKARE CLAIMS PROGRESS
Navi Mumbai : ड्रग्स विक्री करणाऱ्या महिलेच्या घरावर बुलडोझर फिरवला, नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

दरम्यान, केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांनी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी ३१ मेची मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर, रखडलेली कामे वेळेत पूर्ण होतील का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता, तटकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की, आवश्यक परवानग्या आणि प्रक्रियांमध्ये प्रगती झाली असून, काम पूर्णत्वाकडे जात आहे.

MUMBAI GOA HIGHWAY 90 PERCENT COMPLETE TATKARE CLAIMS PROGRESS
Shocking : “तू मला खूश कर, मी तुला जास्त दिवस सुट्टी देईन,” नामांकित कंपनीच्या बॉसची महिला कर्मचाऱ्याकडे अश्लील मागणी

तटकरे पुढे म्हणाले की, माणगाव आणि इंदापूर बायपास प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या कोकण रेल्वे आणि इतर विभागांकडून एनओसी मिळाल्या आहेत. त्यामुळे या कामांना वेग येईल आणि लवकरच ते पूर्ण होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यास मुंबई ते गोवा दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे. कोकणातील पर्यटन, व्यापार आणि वाहतूक व्यवस्थेला याचा मोठा फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले.

MUMBAI GOA HIGHWAY 90 PERCENT COMPLETE TATKARE CLAIMS PROGRESS
Cancer : तरुणांमध्ये वाढतोय घसा आणि तोंडाचा कॅन्सर, 'ही' लक्षण दुर्लक्ष करणं पडेल महागात पडेल

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद पक्ष प्रतोद अमित नाईक, जिल्हा परिषद सदस्य संतोष वर्धा बैलमारे, अलिबाग तालुकाध्यक्ष जयेंद्र भगत आणि चारुहास मगर यांनीही या वेळी हजेरी लावली. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून सुरू असलेल्या टीकेला उत्तर देताना तटकरे यांनी प्रगतीचा आढावा मांडत, प्रकल्प लवकर पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com