Navi Mumbai : ड्रग्स विक्री करणाऱ्या महिलेच्या घरावर बुलडोझर फिरवला, नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Navi Mumbai News : नवी मुंबईत ड्रग्स विक्रेत्या महिलेच्या ३२ लाखांच्या बेकायदेशीर घरावर पोलिसांची बुलडोझर कारवाई. मकोका अंतर्गत गुन्हा दाखल, ड्रग्सविरोधात प्रशासनाचा कडक संदेश.
NAVIMUMBAI DRUG CASE BIG ACTION HOUSE DEMOLISHED BY POLICE
NAVIMUMBAI DRUG CASE BIG ACTION HOUSE DEMOLISHED BY POLICESaam TV
Published On
Summary
  • नवी मुंबईत ड्रग्स प्रकरणात मोठी पोलिस कारवाई

  • ३२ लाखांचे बेकायदेशीर घर बुलडोझरने पाडले

  • मकोका आरोपी शांताबाई करंडकर सध्या कारागृहात

  • ड्रग्सविरोधात प्रशासनाचा कडक संदेश

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्स विक्री करणाऱ्या महिला आरोपी शांताबाई करंडकर (वय ५८) यांच्या घरावर तोडक कारवाई सुरू केली आहे. अवैध धंदे करून शांताबाईने ३२ लाखांचे घर घेतले होते. दरम्यान या घरावर आता कारवाई करण्यात आली असून ड्रग्स विरोधातील कारवाई प्रकरणातील हे मोठं पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे

मिळालेल्या माहितीनुसार, शांताबाईला मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये लाखो रुपयांच्या अमली पदार्थांसह अटक करण्यात आली होती.तिच्या विरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली की, तिने ड्रग्सच्या पैशातून मोठ्या प्रमाणावर मालमत्ता उभी केली होती.

NAVIMUMBAI DRUG CASE BIG ACTION HOUSE DEMOLISHED BY POLICE
Mumbai Crime : कुर्ल्यात गोळीबाराचा थरार, गुंड बाबा याच्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या

या अवैध कमाईतून शांताबाईने नवी मुंबईतील दिघा परिसरात सुमारे ३२ लाख रुपयांचे घर खरेदी केले होते. त्यानंतर या घरावर दोन मजली बांधकामही करण्यात आले होते. मात्र, हे बांधकाम नियमबाह्य असल्याचे समोर आले. याबाबत सिडको प्रशासनाने तिला यापूर्वीच नोटीस बजावून जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते. तरीही कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर पोलिसांनी पुढाकार घेत ही कठोर पावले उचलली.

NAVIMUMBAI DRUG CASE BIG ACTION HOUSE DEMOLISHED BY POLICE
Shocking : अंघोळीचा साबण खाऊन २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, नाशिकमध्ये भयंकर घडलं!

सध्या शांताबाई कारागृहात असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी घर रिकामे करण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे बुधवारी सकाळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवून घटनास्थळी धडक दिली. सर्वप्रथम घरातील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. तसेच, भाडेकरूंना तात्पुरत्या स्वरूपात जवळील मंदिरात हलवण्यात आले. यानंतर बुलडोझरच्या सहाय्याने संपूर्ण बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये.

NAVIMUMBAI DRUG CASE BIG ACTION HOUSE DEMOLISHED BY POLICE
Shocking : “तू मला खूश कर, मी तुला जास्त दिवस सुट्टी देईन,” नामांकित कंपनीच्या बॉसची महिला कर्मचाऱ्याकडे अश्लील मागणी

नवी मुंबई शहरात ड्रग्स विक्रेत्याच्या मालमत्तेवर अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे. या पावलामुळे ड्रग्स व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींना कडक इशारा मिळाला आहे. भविष्यातही अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले असून, शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन अधिक कठोर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com