Cancer : तरुणांमध्ये वाढतोय घसा आणि तोंडाचा कॅन्सर, 'ही' लक्षण दुर्लक्ष करणं पडेल महागात पडेल

Alisha Khedekar

तरुणांमध्ये घशाचा आणि तोंडाचा कर्करोग

पूर्वी वृद्धांमध्ये दिसणारा तोंड व घशाचा कर्करोग आता ४० वर्षांखालील लोकांमध्येही वाढतोय, ही चिंतेची बाब आहे.

Throat and mouth cancer in young people | Saam Tv

लक्षणांकडे दुर्लक्ष

सुरुवातीची लक्षणे साधी वाटल्याने लोक दुर्लक्ष करतात, त्यामुळे उशिरा निदान होऊन उपचार कठीण होतात.

Ignoring the symptoms of throat and mouth cancer | Saam Tv

तोंडात सूज येणे

तोंडातील व्रण २-३ आठवड्यांत न भरल्यास ते गंभीर असू शकते, त्वरित डॉक्टरांकडे तपासणी आवश्यक आहे.

Throat and mouth cancer Swelling in the mouth | Saam tv

आवाजातील बदल

सतत घोगरा आवाज किंवा आवाजात बदल होणे हे घशाच्या कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.

Throat and mouth cancer Voice changes | Saam Tv

गिळताना त्रास

अन्न गिळताना अडचण जाणवणे किंवा वेदना होणे ही बाब दुर्लक्षित करू नये, कारण ते गंभीर आजाराचे संकेत असू शकतात.

Throat and mouth cancer Difficulty swallowing food | Saam tv

घशातील गाठ

घशात गाठ किंवा सूज जाणवणे हे कर्करोगाचे संकेत असू शकतात, त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

Throat and mouth cancer Throat lump | Saam Tv

तंबाखूचे दुष्परिणाम

सिगारेट, गुटखा, तंबाखू यांचा दीर्घकाळ वापर हा तोंडाच्या कर्करोगाचा सर्वात मोठा कारण आहे.

Throat and mouth cancer Side effects of tobacco | Saam Tv

दारू व सुपारीचा धोका

दारूसोबत तंबाखू आणि सुपारीचे सेवन केल्यास कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो.

Throat and mouth cancer Risk of alcohol and betel nut | Saam tv

आधुनिक जीवनशैली

ताण, झोपेची कमतरता, जंक फूड, प्रदूषण आणि व्हेपिंग यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते.

Modern lifestyle | Saam tv

वेळेवर तपासणी

लक्षणे दिसताच तपासणी केल्यास कर्करोग लवकर ओळखून उपचार शक्य होतात, त्यामुळे जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे.

Taking Doctor Opinion For Throat And Mouth Cancer | Saam Tv

NEXT : मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'ही' फळे वरदान, खाण्याची योग्य वेळ कोणती?

Diabetes | saam tv
Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'ही' फळे वरदान, खाण्याची योग्य वेळ कोणती?