Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'ही' फळे वरदान, खाण्याची योग्य वेळ कोणती?

Shreya Maskar

फळे

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी जीवनशैलीत बदल, संतुलित आहार आणि नियमित व्यायामाचा समतोल राखणे आवश्यक आहे. तसेच आहारात हेल्दी फळांचा समावेश करा.

Fruits | pinterest

फळे खा

ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ती फळे मधुमेही रुग्णांसाठी हेल्दी आहेत. या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

Eat Fruits | pinterest

कोणती फळे खावीत?

सफरचंद, पेरू, पपई, संत्रे, नाशपाती, स्ट्रॉबेरीसारखी फळे मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी खावी. यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.

Which Fruits Should You Eat | pinterest

फळे कधी खावी?

मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी सकाळी किंवा दिवसा फळे खाणे चांगले आहे, कारण त्या वेळी शरीराची चयापचय क्रिया सक्रिय असते आणि साखरेचा वापर ऊर्जेसाठी केला जाऊ शकतो.

Fruits | pinterest

रक्तातील साखरेची पातळी

मधुमेही रुग्णांनी रिकाम्या पोटी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात फळे खाणे टाळावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. जे आरोग्यास घातक ठरते.

Blood Sugar Levels | pinterest

फळांचे प्रमाण

रात्री फळे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, कारण त्या वेळी शरीराची हालचाल कमी असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी साधारणपणे एक लहान वाटी किंवा एक मध्यम आकाराचे फळ पुरेसे मानले जाते.

Fruit | Saam Tv

फळांचा रस टाळा

मधुमेहाच्या रुग्णांनी संपूर्ण फळे खावीत आणि रस पिणे टाळावे. रसांमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते आणि त्यातून साखर वेगाने बाहेर पडते, ज्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते.

Avoid Fruit Juices | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : पायाचे दुखणे दुर्लक्षित करू नका; असू शकतो मधुमेहाचा धोका, वाचा 5 लक्षणे

Diabetes Symptoms | saam tv
येथे क्लिक करा...