Diabetes Symptoms : पायाचे दुखणे दुर्लक्षित करू नका; असू शकतो मधुमेहाचा धोका, वाचा 5 लक्षणे

Shreya Maskar

मधुमेहाचा धोका

तुमच्या पायांना सतत या समस्य होत असतील तर तुम्हाला मधुमेहाचा धोका असू शकतो. मधुमेहाची लक्षणे जाणून घ्या आणि वेळीच सावध व्हा.

Diabetes | yandex

पायांचे आरोग्य

आपले पाय आपल्या संपूर्ण शरीराचे वजन घेतात. पायांमधील रक्ताभिसरण कमी होणे किंवा मज्जातंतूंचे कार्य नीट न होणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. मधुमेह रक्ताभिसरण आणि मज्जातंतूंचे कार्य या दोन्हीवर परिणाम करतो.

leg | yandex

पायाला मुंग्या येणे

अनेक लोकांना पायाला मुंग्या येतात. सतत बसल्यामुळे असे होत असावे, असे ही लोक गृहीत धरतात. परंतु हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. हे मज्जातंतूंच्या नुकसानाचे लक्षण असू शकते.

leg pain | yandex

पोटऱ्यांमध्ये जळजळ

अनेक लोकांना पोटऱ्यांमध्ये जळजळ जाणवते. ही समस्या बहुतेकदा जास्त चालण्यामुळे किंवा थकव्यामुळे उद्भवते. तसेच मज्जातंतूंच्या कार्यातही अडथळा आल्याने असे होऊ शकते.

leg pain | yandex

पायांचे तापमान

कधीकधी पायांच्या तळव्यांचे तापमान बदलते. काही लोकांचे पाय खूप थंड होतात, तर काहींचे खूप गरम होतात. हे बहुतेकदा रक्तवाहिन्यांना झालेल्या नुकसानीमुळे होते.

leg pain | yandex

त्वचेचा रंगात बदलतो

पायांच्या घोट्यांच्या आणि पोटऱ्यांच्या त्वचेच्या रंगात बदल होतो. ते अधिक गडद दिसतात किंवा त्यावर डाग पडतात. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो, ज्यामुळे त्वचेत बदल होतात.

leg pain | yandex

पायांवरील केस कमी होतात

पायांवरील केस झपाट्याने कमी होत असेल तर हे मधुमेहाचे लक्षण आहे. हे रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे होते. मधुमेहामध्ये केसांच्या मुळांपर्यंत पुरेसे पोषक तत्व आणि ऑक्सिजन पोहोचत नाहीत.

leg pain | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Diabetes | yandex

NEXT : हतगड किल्ला ट्रेकर्ससाठी भटकंतीचं खास ठिकाण, वीकेंडला नक्की जा

Hatgad Fort | SAAM TV
येथे क्लिक करा...