Shreya Maskar
नाशिक जिल्ह्यातील हातगड किल्ला हे महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे. जे सह्याद्रीच्या रांगेत, सापुतारा हिल स्टेशनजवळ (गुजरात-महाराष्ट्र सीमेवर) आहे.
हतगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला असून तो रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा होता. मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी हे बेस्ट लोकेशन ठरेल.
पावसाळ्यात गडाच्या पायऱ्या निसरड्या असतात. त्यामुळे हिवाळ्यात हतगड किल्ल्याला आवर्जून भेट द्या.
हातगड किल्ला हा डोंगरी किल्ला या प्रकारात मोडतो. हातगड किल्ल्यावरून निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.
हातगड किल्ल्याची वैशिष्ट्ये म्हणजे त्याचे चार प्रवेशद्वार, हनुमानाची मूर्ती, गंगे-जमुनेसारखी पाण्याची टाकी, आणि गडावरील प्राचीन शिलालेख, तसेच मराठा स्थापत्यकलेचे अवशेष
हातगड किल्ल्याची तटबंदी, बांधीव रचना आणि अवशेषांमध्ये मराठा स्थापत्यशैली दिसते. तुम्ही येथे वीकेंडला फिरण्याचा प्लान करू शकता.
हातगड किल्ल्यावरून सह्याद्रीच्या टेकड्या, दऱ्यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. तसेच इतिहासप्रेमींसाठी हे खास लोकेशन आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.