Shreya Maskar
मुंबईत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी खास ठिकाणे, जाणून घ्या. येथे तुम्हीला फुल पार्टीचे वातावरण पाहायला मिळेल.
मुंबईत गेट वे ऑफ इंडियाला 31 आणि न्यू इयरसाठी रोषणाई केलेली पाहायला मिळते. तसेच रात्री 12 च्या सुमारास फटाक्यांची आतिषबाजी होते. हा नजारा पाहायला हजारो पर्यटक येतात.
न्यू इयर सेलिब्रेशनसाठी मरिन ड्राईव्ह बेस्ट लोकेशन आहे. येथे समुद्रकिनारी कट्ट्यावर बसून तुम्ही भन्नाट वेळ घालवू शकता. केक कापू शकता. जुन्या आठवणींना उजाळा द्या.
अंधेरीवरून वर्सोवा बीच काही मिनिटांच्या अंतरावर आहे. तुम्ही संध्याकाळी येथे निवांत वेळ घालवू शकता. कपल्ससाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
दादर चौपाटी मुंबईचे आकर्षण आहे. दादर चौपाटीवरून वरळी सी-लिंकचा खूप सुंदर आणि विहंगम नजारा दिसतो, विशेषत- सूर्यास्ताच्या वेळी हा देखावा खूपच आकर्षक असतो.
अर्नाळा बीच विरारपासून जवळच आहे. येथे बोटींगचा आनंद घेता येतो. येथे आजूबाजूला अनेक रिसॉर्ट आहेत. त्यामुळे तुम्ही येथे नाइट आउटचा प्लान करू शकता.
जुहू बीच देखील न्यू इयर सेलिब्रेशनसाठी बेस्ट आहे. येथे खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. तसेच हिवाळ्यात थंड वातावरण अनुभवता येईल.
वरळी सी फेसवरून मुंबई शहराचे विहंगम, सुंदर दृश्य दिसते. तसेच रात्रीच्या वेळेस सी-लिंक व शहराच्या दिव्यांचा मनमोहक नजारा अनुभवता येतो.