Shreya Maskar
वर्षाच्या शेवटी न्यू इअर ट्रिपला खास ट्रेकिंग प्लान करा. नाशिकमध्ये सुंदर ऐतिहासिक ठिकाण आहे.
मोरागड हा नाशिक जिल्ह्यातील बागलाण परिसरातील सेलबारी डोंगररांगेत असलेला एक डोंगरी किल्ला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मोरगड किल्ला हा मुल्हेर किल्ल्याचा भाग आहे. येथील पठारावरून मुल्हेर, हरगड, साल्हेर आणि मांगी-तुंगी यांसारख्या किल्ल्यांचे विहंगम दृश्य दिसते.
मोरगड किल्ला हा ट्रेकिंगसाठी बेस्ट आहे. हा एक आव्हानात्मक ट्रेक आहे. ज्यामुळे गिर्यारोहकांसाठी हे लोकप्रिय ठिकाण बनले आहे.
मोरागड किल्ला आणि मुल्हेर किल्ला दोन्ही किल्ले एकमेकांना लागून आहेत. मोरागड हा मुल्हेरचा दुसरा बालेकिल्ला मानला जातो.
मोरागड किल्ला हा प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठीच बांधला गेला होता. इतिहासात किल्ल्याचे मोठे महत्त्व आहे.
मुल्हेर किल्ल्यावर सोमेश्वर मंदिर आहे आणि तिथूनच मोरागड किल्ल्याच्या ट्रेकिंगचा मार्ग सुरू होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.