Shreya Maskar
लोणावळा हे सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले एक सुंदर आणि लोकप्रिय हिल स्टेशन आहे. मुंबई , पुण्यातील लोकांसाठी एक उत्तम पर्यटन स्थळ आहे.
लोणावळा हिरवळ रान, दऱ्या, धबधबे आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.
लोणावळा आणि खंडाळा सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील थंड हवेची ठिकाणे आहेत. खंडाळ्यातील कुणे धबधबा खूप प्रसिद्ध आहे.
हाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी जगप्रसिद्ध आहे. स्वस्तात मस्त फिरण्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे. तुम्ही येथे सूर्योद्याचा सुंदर नजारा पाहू शकता.
माथेरान हे आशियातील एकमेव ऑटोमोबाईल-मुक्त (वाहने नसलेले) हिल स्टेशन आहे, जिथे प्रदूषण नाही आणि शांतपणे फिरता येते.
पाचगणी हे हनिमूनसाठी एक उत्तम ठिकाण आहे, कारण ते निसर्गरम्य व्हॅली, शांत वातावरण, थंड हवा आणि साहसी गोष्टींसाठी ओळखले जाते.
सिंहगड किल्ला पुण्याजवळचा एक अत्यंत लोकप्रिय ट्रेकिंग आणि ऐतिहासिक किल्ला आहे, जो त्याच्या शौर्यकथा, निसर्गरम्य देखावे आणि ट्रेकिंगच्या अनुभवासाठी ओळखला जातो.
वेताळ टेकडी हे पुण्यातील विरंगुळ्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी शहराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे.