Shreya Maskar
पालगड किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-दापोली रस्त्यावरील पालगड गावाजवळ सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर घनदाट जंगलात आहे.
असे बोले जाते की, पालगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. हा गिरीदुर्ग प्रकारात मोडतो.
पालगड किल्ला घनदाट जंगलाने वेढलेला आहे. त्याचा उपयोग टेहळणीसाठी केला जायचा. हे एक इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण आहे.
पालगड किल्ला हे ठिकाण साने गुरुजींच्या जन्मस्थानासाठी ओळखले जाते. पालगड किल्ला जास्त कोणाला माहीत नाही.
पालगड किल्ल्याच्या परिसरात प्रतापगड आणि रायगड हे दोन्ही ऐतिहासिक किल्ले आहेत. हे दोन्ही किल्ले ट्रेकिंगसाठी बेस्ट आहेत.
दापोलीला गेल्यावर कड्यावरचा गणपती, सुवर्णदुर्ग किल्ला, अंजर्ले बीच, केळशी बीच, लाडघर बीच, हर्णै बंदर ही ठिकाणे पाहायला नक्की जा.
दापोलीला गेल्यावर राहण्याची, खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. नवीन वर्षात तुम्ही येथे नक्की फिरायला जाऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.