Shreya Maskar
2025 चा शेवटचा टप्पा आला आहे. डिसेंबर महिन्याचे काही दिवस उरले आहेत. यात भन्नाट न्यू इयर ट्रिप प्लान करा. सुंदर लोकेशन आताच नोट करा.
सापुतारा हे हिल स्टेशन गुजरातमध्ये, डांग जिल्ह्यात, पश्चिम घाटात (सह्याद्री पर्वतरांगेत) वसलेले आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर आहे.
सापुतारा हे 'सर्पपूजे'साठी प्रसिद्ध आहे, कारण 'सापुतारा' या नावाचा अर्थ 'सापांचे निवासस्थान' असा होतो. सर्पगंगा नदीच्या काठावर सापाची प्रतिमा आहे.
सापुताराला भेट दिल्यावर गिरा धबधबा नक्की पाहायला जा. गुलाबी थंडीत तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सापुतारा या हिल स्टेशनला नक्की भेट द्या. सापुतारा ट्रेकिंग, पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध आहे.
सापुताराजवळ सनसेट पॉईंट, लेक गार्डन, गिरा धबधबा, वांसदा राष्ट्रीय उद्यान आणि सापुतारा तलाव ही सुंदर पर्यटन स्थळे आहेत. थंडीत नक्की फिरा.
सापुतारा तलावाच्या काठावर नागेश्वर महादेव मंदिर आहे, जे भगवान शिवाला समर्पित आहे. सापुतारा तलावात बोटींगचा आनंद घेता येतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.