Shreya Maskar
जीवधन किल्ला महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात, घाटघर या गावाजवळ आहे.
जीवधन किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी बांधला गेला होता. जीवधन किल्ला हा दुर्गम किल्ला आहे.
जीवधन किल्ला ट्रेकिंगसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे, जो सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. जीवधन किल्ला चढाई कठीण आहे.
जीवधन किल्ला हा प्राचीन अभियांत्रिकी आणि संरक्षणात्मक वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
जीवधन किल्ल्यावर सातवाहन काळातील शिलालेख आढळतात. वीकेंडला जीवधन किल्ल्याला मित्रांसोबत आवर्जून भेट द्या.
जीवधन किल्ल्याजवळ उलटा धबधबा आहे. पावसाळ्यात जोरदार वाऱ्यामुळे जेव्हा धबधब्याचे पाणी खाली येण्याऐवजी वरच्या दिशेने फेकले जाते, तेव्हा त्याला 'उलटा धबधबा' म्हणतात.
जीवधन किल्ल्यावरून सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे आणि आसपासच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.