Shreya Maskar
हिवाळ्यात चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाचे सौंदर्य चांगले खुलते. हिवाळ्यात वन डे पिकनिकसाठी हे बेस्ट लोकेशन आहे. त्यामुळे येथे आवर्जून जा.
चिखलदरा अमरावती जिल्ह्यात वसलेले थंड हवेचे ठिकाण आहे. हे विदर्भात येते. हे हिल स्टेशन सातपुडा पर्वतरांगेत आहे.
चिखलदरा येथे गेल्यावर मेळघाट व्याघ्र प्रकल्प, गाविलगड किल्ला, भीमकुंड पॉइंट आणि चिचाटी वॉटरफॉल, मेळघाट वन्यजीव अभयारण्य, बीर तलाव, मोजरी पॉइंट आणि बोटॅनिकल गार्डनर ही ठिकाणे पाहायला मिळतात.
चिखलदरा येथील भीमकुंड एक पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण आहे . हे नीळकुंड म्हणूनही ओळखले जाते. असे बोले जाते की, भीमाने राक्षसाचा वध केल्यानंतर येथे स्नान केले होते.
गाविलगड किल्ला हा जुना आणि ऐतिहासिक किल्ला आहे. गाविलगड किल्ल्यावर ट्रेकिंगचा आनंद घेता येतो.
मेळघाट वन्यजीव अभयारण्यात तुम्हाला विविध प्राणी, पक्षी पाहायला मिळतात. येथे हिरवागार निसर्ग पाहायला मिळतो.
चिचाटी वॉटरफॉल विदर्भातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. हिवाळ्यात डोंगरावर धुक्याची चादर पाहायला मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.