Shreya Maskar
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात इर्शाळगड हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. लहान मुलांसोबत येथे आवर्जून जा.
इर्शाळगड किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असून, प्रबळगडाचा तो एक भगिनी किल्ला आहे. त्यामुळे प्रबळगडाला देखील भेट द्या.
इर्शाळगड हा प्रबळगड आणि माणिकगड यांच्या दरम्यानच्या परिसरावर टेहळणी ठेवण्यासाठी वापरला जात असे.
इर्शाळगड ट्रेक हा मध्यम आणि अवघड स्वरूपाचा मानला जातो. हिवाळ्यात थंड वातावरणात ट्रेकिंग करायची मजा खूपच वेगळी आहे.
इर्शाळगडवर एक नैसर्गिक छिद्र आहे, ज्याला 'नेढे' किंवा 'नीडल्स आय' म्हणतात. यातून निसर्गाचे मनमोहक दृश्य दिसते.
इर्शाळगड माथेरान हिल स्टेशनच्या जवळ आहे. त्यामुळे हिवाळ्यात माथेरानला गेल्यावर इर्शाळगडला आवर्जून जा.
इर्शाळगडाच्या माथ्यावरून मोरबे धरण, प्रबळगड, कलावंतीण आणि माथेरान पठार यांसारख्या महत्त्वाच्या स्थळांचे सुंदर दृश्य दिसते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.