

रोज लाखो प्रवास मुंबईत रेल्वेने प्रवास करतात. मुंबईकरांचा सर्वाधिक प्रवास हा ट्रेननेच होतो. अनेकजण रोज ऑफिसला जाताना-येताना ट्रेनने जातात. दरम्यान, अनेकजण विनातिकीट ट्रेनचा प्रवास करतात. विनातिकीट ट्रेनचे प्रवास करणे हा गुन्हा आहे. याच प्रवाशांना पकडण्यासाठी अनेक स्टेशनवर टीटीई असतात. या प्रवाशांना दंड भरावा लागतो. मुंबईतील एका ट्रॅव्हेलिंग तिकिटिंग इन्स्पेक्टरने तिकीट तपासणीद्वारे जवळपास १ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 'ओपन डिटेल बॅच'चे 'ट्रॅव्हलिंग टिकिटिंग इन्स्पेक्टर' श्री. मोहम्मद शम्स चांद यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तिकीट तपासणीद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाचा १ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. त्यांनी ११,४८३ विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून १ कोटी ३८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. आर्थिक वर्षात १ कोटींचा टप्पा पार करणारे हे पहिले तिकीट तपासणीस कर्मचारी ठरले आहेत.
अनेकजण विनातिकीट प्रवास करतात त्यामुळे रेल्वेचे खूप आर्थिक नुकसान होते. मात्र, चांगल्या कामगिरीमुळे १ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामुळे रेल्वेचे नुकसान वाचवण्यात मोलाचा हातभार लागला आहे. असेच अनेक टीटीई अनेक रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणी करत असतात. अनेक टीसी ट्रेनमध्ये चढूनदेखील तिकीट चेक करतात. त्यामुळे रेल्वेने प्रवास करताना तुमच्याकडे तिकीट असायलाच हवे.
मध्य रेल्वेने प्रवाशांना सांगितले आहे की, फक्त तिकीट घर, एटीव्हीएम किंवा आयआरसीटीसी वेबसाइटवरुन तिकीट बुक करुन प्रवास करा. याचसोबत तुम्ही ऑनलाइन रेलवन अॅपद्वारे तिकीट आरक्षित करु शकतात. यामुळे तुमचा प्रवास सोपा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.