Pune Metro : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत अपडेट, वाचा मेट्रो ३ कधी सुरू होणार?

Pune Metro Line 3 News : पुणे मेट्रो लाइन-३ हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाचे काम अपेक्षेपेक्षा उशिरा पूर्ण होत आहे. मे महिन्यात १२ किमी मार्ग सुरू होणार असून उर्वरित ११ किमी मेट्रो जुलैमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे.
Pune Metro : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत अपडेट, वाचा मेट्रो ३ कधी सुरू होणार?
Pune Metro Line 3 NewsSaam Tv
Published On
Summary
  • हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम विलंबाने

  • मे महिन्यात १२ किमी आणि जुलैमध्ये उर्वरित ११ किमी मार्ग सुरू होणार

  • पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलामुळे प्रकल्पाला विलंब

  • पुणेकरांना मेट्रो प्रवासासाठी अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागणार

सचिन जाधव, पुणे

पुणेकरांसाठी मोठी बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरू होण्यासाठी अजून वाट पहावी लागणार. पुणे मेट्रो लाइन तीन हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणास्तव हे काम रखडले. माण- हिंजवडी- शिवाजीनगर पुणे मेट्रो लाइन तीन हा मार्ग दोन टप्प्यांत सुरू होणार आहे. मे महिन्यात १२ किलोमीटर लांबीची मेट्रो सुरू होईल, तर जुलै महिन्यात उर्वरित ११ किलोमीटर मार्ग सुरू होईल. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना आणखी काही महिने प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

सध्या पुण्यात ३३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने देशातील पहिल्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) असलेल्या २३ किमीच्या मेट्रो प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात असून,त्यापैकी १२ किमी मार्गाचे उद्घाटन मे महिन्यात, तर उर्वरित ११ किमी मार्ग जुलै महिन्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. या दोन्ही प्रकल्पांसह पुण्यातील मेट्रोचे एकूण जाळे ५६ किलोमीटरपर्यंत पोहोचेल,आणखी ५५ किलोमीटरचे काम सुरू आहे.

Pune Metro : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत अपडेट, वाचा मेट्रो ३ कधी सुरू होणार?
Mumbai : 'बुलाती है मगर जाने का नहीं' पुरुषांना जाळ्यात ओढायच्या, कॅफेत नेऊन भलतंच करायच्या, मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर

पुणे मेट्रो लाइन तीन हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम डिसेंबर २०२५पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; पण पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या कामास उशीर झाल्यामुळे काम पूर्ण करण्यास मार्च २०२६पर्यंत मुदतवाढ दिली होती. नागरिकांना हा मार्ग सुरू होण्याची मोठी प्रतीक्षा आहे.पण आतापर्यंत दोन वेळा मार्ग सुरू होण्याची डेडलाइन हुकली आहे. त्यामुळे आता जुलैमध्ये तर मेट्रो सुरु होणार का? असा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com