Sunday Megablock : रविवारी मध्य अन् हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वाचा वेळापत्रक

Sunday 22nd February Train Megablock Update News : मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. अनेक लोकल गाड्या उशिरा धावणार असून काही सेवा रद्द राहणार असल्याने प्रवाशांनी वेळापत्रक तपासून प्रवास करावा.
Sunday Megablock : रविवारी मध्य अन् हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वाचा वेळापत्रक
Sunday 22nd February Train Megablock Update News Saam Tv
Published On
Summary
  • मुंबईत मध्य व हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर

  • अनेक लोकल गाड्या उशिरा, काही सेवा रद्द

  • ठाणे-मुलुंडदरम्यान मार्ग बदल आणि विलंब

  • प्रवाशांसाठी विशेष पर्यायी सेवा उपलब्ध

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे घराबाहेर पडत असाल तर थांबा. रेल्वे प्रशासनाने मुंबईच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा चांगलाच फटका बसणार आहे.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०४ ते दुपारी ३.०९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. तसेच ठाणे स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

Sunday Megablock : रविवारी मध्य अन् हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वाचा वेळापत्रक
Mumbai Local News : रेल्वे प्रवाशांना लागणार शिस्त; अपघाताचं प्रमाण होणार कमी, काय आहे रेल्वे प्रशासनाचा नवा उपक्रम?

कल्याण येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.२४ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. तसेच मुलुंड स्थानकावर पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाउन धीम्या गाड्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

Sunday Megablock : रविवारी मध्य अन् हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वाचा वेळापत्रक
Accident : ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी १८ दिवसापूर्वी पुण्यातून निघाले, पण गुजरातमध्ये काळाने घात केला; ३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

हार्बर मार्गावर असा असणार मेगा ब्लॉक

पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत, आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईन सेवा सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी १५.५३ पर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स-हार्बर लाईन सेवा आणि ठाणेहून सकाळी १०.०१ ते दुपारी १५.२० पर्यंत पनवेलकडे जाणारी डाउन ट्रान्स-हार्बर लाईन सेवा रद्द राहतील.

Sunday Megablock : रविवारी मध्य अन् हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वाचा वेळापत्रक
Yavtmal Crime : दोस्त दोस्त ना रहा! संतापलेल्या मित्रानेच जिवाभावाच्या मित्राची केली हत्या, यवतमाळ हादरले

ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी विभागात विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील. तसेच ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. या काळात पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असतील. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी मेगा ब्लॉक आवश्यक असल्याचं रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे. तसेच प्रवाशांच्या गैरसोयींबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com