

रेल्वेत नोकरी करण्याची संधी
२८०१ अप्रेंटिस पदासाठी भरती
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?
रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे आणि त्या अनुभवाचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होणार आहे. साउथ सेंट्रल रेल्वेत अप्रेंटिसशिप पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही RRC SCR च्या scr.indianrailways.gov.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०२६ आहे.
२८०१ पदांसाठी भरती
साउथ सेंट्रल रेल्वेत २८०१ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ट्रेडनुसार विविध विभागात भरती केली जाणार आहे.एसी मेकॅनिक पदासाठी २५१ जागा रिक्त आहेत. कारपेंटर पदासाठी २२ जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक पदासाठी ८८ जागा, इलेक्ट्रिशियन पदासाठी १२५८ जागा रिक्त आहे. फिटर पदासाठी ५३९ जागा रिक्त आहेत. वेल्डर पदासाठी २०२ जागा रिक्त आहेत. विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास केलेली असावी. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २४ असावे. आरक्षिक प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा? (Railway Recruitment Application Process)
इच्छुकांनी scr.onlineregister.org.in/login या वेबसाइटवर जावे.
यानंतर रजिस्टरवर क्लिक करुन तुमची माहिती भरा आणि रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
यानंतर लॉग इन करुन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर फी जमा करा.
फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.