Railway Recruitment: फ्रेशर्स आहात? रेल्वेत काम करण्याची संधी; १९२ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Railway RWF Apprentice Recruitment 2026: रेल्वे व्हील फॅक्टरीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.
Railway Recruitment
Railway RecruitmentSaam tv
Published On
Summary

रेल्वे व्हील फॅक्टरीत नोकरीची संधी

अप्रेंटिस पदासाठी भरती

मिळणार स्टायपेंड १२,००० रुपये

फ्रेशर्स आहात आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. रेल्वेत तुम्हाला काम करायची संधी मिळणार आहे. रेल्वेत काम करण्याची संधी आणि अनुभवदेखील मिळणार आहे. रेल व्हीकल फॅक्टरीमध्ये सध्या अप्रेंटिस ट्रेनिंग सुरु आहे. या अप्रेंटिसशिपसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत.

Railway Recruitment
Indian Navy Recruitment: १२वी पास तरुणांसाठी खुशखबर; भारतीय नौदलात नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

रेल्वे व्हील फॅक्टरीत काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या कालावधीत तुम्हाला ट्रेनिंग दिले जाणार आहेत. याचसोबत स्टायपेंडदेखील मिळणार आहे. तुम्हाला अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट मिळणार आहे. एकूण १९० पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

ट्रेडमध्ये ही अप्रेंटिसशिप करण्याची संधी तुमच्याकडे आहे. फिटर, मेकॅनिस्ट, मेकॅनिक, टर्नर, सीएनसी प्रोग्रामिंग कम ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक अशा पदांसाठी भरती होणार आहे.

पात्रता

रेल व्हील फॅक्टरीतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत नॅशनल काउंसिल वोकेशनल ट्रेनिंगकडून मान्यताप्राप्त विद्यापीठातून नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २४ मध्ये असावे.

Railway Recruitment
Railway Jobs: रेल्वेत सर्वात मोठी भरती! २१९९७ रिक्त पदे; अर्ज करण्याची मुदत वाढवली, शेवटची तारीख काय?

स्टायपेंड

अप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या काळात फिटर, मेकॅनिस्ट, मेकॅनिक, टर्नर, इलेक्ट्रिशियन,इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक पदासाठी १२,२६१ रुपये स्टायपेंड मिळणार आहे. तर सीएनसी प्रोग्रामिंग कम ऑपरेटर पदासाठी मासिक पगार १०,८९९ रुपये मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी १ एप्रिलपर्यंत आहे.

Railway Recruitment
HPCL Jobs: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी; ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; वर्षाला पॅकेज ५० लाख रुपये; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com