Kalyan Murbad : कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची अपडेट, रेल्वे मंत्र्यांनी सांगितला सर्वात मोठा अडथळा

Kalyan Murbad Railway Latest News : कल्याण–मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे ₹८३६ कोटी खर्च अपेक्षित असून जमीन अधिग्रहण हा सर्वात मोठा अडथळा असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
Kalyan Murbad Railway Latest News
Kalyan Murbad Railway Latest NewsSaam TV Marathi
Published On

Kalyan-Murbad Railway Line Update News : कल्याण-मुरबाड हा नवीन रेल्वे मार्ग भिवंडी आणि कल्याण परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा (लाईफलाईन) आहे. या रेल्वे मार्गासाठी साधारण ₹८३६ कोटी खर्च अपेक्षित असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister, Ashwini Vaishnaw) यांनी सभागृहात दिली. (Kalyan-Murbad railway project ) या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाची माहिती देताना हा मार्ग का महत्त्वाचा आहे, यावरही त्यांनी भाष्य केले. यावेळी बोलताना वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी रेल्वेच्या कवच प्रणालीची माहितीही दिली. त्याशिवाय कोकण रेल्वेची क्षमता वाढवण्यात येत असल्याचेही सांगितले. (Ashwini Vaishnaw Kalyan Murbad Railway) राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी सभागृहात या रेल्वे मार्गाबाबत प्रश्न उपस्थित केला होत.

कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गात नेमका अडथळा काय?

भिवंडी, कल्याण, मुरबाड (Bhiwandi Kalyan Railway)हा भाग शहरी आहे. त्यामुळे येथील जमिनीचे भाव खूप जास्त आहेत. सुरुवातीला फक्त जमीन अधिग्रहणासाठी १४०० कोटी रूपयांचा खर्च येईल असा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले. जमिनीच्या वाढीव खर्चामुळे प्रकल्पात काही अडचणी येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि स्थानिक खासदार या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी (Ashwini Vaishnaw) सांगितले. जमिनीचा प्रश्न मार्गी लावून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यावर सरकारचा भर असल्याचे ते म्हणाले. (Kalyan Murbad Railway Update)

Kalyan Murbad Railway Latest News
LPG price : मोठी बातमी! सांगलीत व्यवसायिक गॅस किंमतीचा स्फोट, वाहनांच्या एलपीजी दरात मोठी वाढ

नव्या मार्गामुळे काय फायदा होणार?

नव्या रेल्वे मार्गामुळे मुरबाड हे थेट कल्याण आणि मुंबईला जोडले जाईल. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कमी होईलच. त्याशिवाय पैसे आणि प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. नव्या रेल्वे मार्गामुळे मुरबाड, भिवंडी आणि आजूबाजूच्या परिसरातील विकासाला आणखी गती मिळणार असल्याचे रेल्वे मंत्री म्हणाले.

Kalyan Murbad Railway Latest News
Instagram Down : अचानक इंस्टाग्राम झालं ठप्प, रील प्रेमींचा जीव टांगणीला, भन्नाट मीम्सचा पाऊस

कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गावर कोणती स्थानके?

कल्याण-मुरबाड हा २८ ते ३० किलोमीटर (Kalyan to Murbad Distance) लांबीचा रेलवे मार्ग असेल. या मार्गावर कल्याण (Kalyan), शहाड (Shahad),आंबिवली (Ambivli), कांबा रोड (Kamba Road), आपटी (Apti),मुरबाड (Murbad) ही स्थानके असतील, असा अंदाज आहेत. सध्या कल्याण ते मुरबाड बस किंवा खासगी वाहनाने जाण्यासाठी १ तासाचा वेळ लागतो. पण या नव्या रेल्वे मार्गामुळे हा प्रवास फक्त ३० मिनिटात होण्याची शक्यता आहे.

Kalyan Murbad Railway Latest News
१०,२०,५० च्या नोटा ATM मध्ये का नाहीत? देशात चलनाचा तुटवडाय? वाचा नेमकं सत्य

कोकण रेल्वेची क्षमता वाढवणार ?

कोकण रेल्वेची क्षमता कधी वाढवली जाणार या संदर्भात संसदेत प्रश्न विचारम्यात आला होता. त्यावर बोलताना रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले की, 'कोकण रेल्वेची क्षमता वाढीसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. कोकण रेल्वे ही एक महत्त्वाची रेल्वे आहे. बोगदे आणि ट्रॅक मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.' महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ हे या प्रकल्पात भागधारक आहेत. त्यासाठी कर्नाटक आणि केरळ राज्य सरकारांकडे सहकार्याची विनंती केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कवच प्रणालीचं काम कुठपर्यंत?

देशात कवच (ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम) प्रणालीचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना दिली. ते म्हणाले की, कवच ही पाच उपप्रणालींनी बनलेली एक जटिल प्रणाली आहे. ८,५७० किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबल्स टाकण्यात आल्या आहेत. १,१०० हून अधिक टेलिकम्युनिकेशन टॉवर्स बसवण्यात आले आहेत आणि ७६७ स्टेशन डेटा सेंटर्सची स्थापना करण्यात आली आहे.

Kalyan Murbad Railway Latest News
LPG गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबणार; फक्त एक कॉल करा आणि पोलिसांना कळवा, आयुक्तांचे कडक निर्देश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com