Instagram Down : अचानक इंस्टाग्राम झालं ठप्प, रील प्रेमींचा जीव टांगणीला, भन्नाट मीम्सचा पाऊस
Instagram Down World Wide Latest News : जगभरात इंस्टाग्राम अचानक ठप्प झालं अन् रील प्रेमींचा जीव टांगणीला लागला. अनेकांना लॉगइन करण्यात अडचण येत होती. तर काहीजण फक्त रिफ्रेशच करत राहिले, पण त्यांना ताज्या रिल्स पाहताच येत नव्हत्या. त्यामुळे अनेकांना माझं नेट संपलं की काय? असा प्रश्न सतावत आहे. इन्स्टाग्राम सर्व्हर डाऊन झाल्यानंतर जागतिक स्तरावर इन्स्टाग्रामची सेवा विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. हजारो युजर्सनी इतर सोशल मीडियावर याच्या तक्रारी नोंदवल्या. फेसबूक, ट्वीटरसह इतर सोशल मीडिया प्लॅट फॉर्मवर इन्स्टाग्राम डाऊन झाल्याने तीव्र पडसाद उमटले. अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत.
सकाळपासूनच अनेकांना इंस्टाग्राम वापरण्यात अचडण येत होती. भारतासह जगभरातील युजर्सला इंस्टाग्राम वापरताना तांत्रिक अडणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तक्रारींचा पाऊस पडत आहे. अमेरिकेतील १०,००० पेक्षा जास्त युजर्सने ऑनलाइन आउटेज मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म डाउनडिटेक्टरवर तक्रारी नोंदवल्या आहेत. भारतामध्येही शेकडो लोकांनी इंस्टाग्रामवर तक्रारी नोंदल्यात. या तक्रारी सर्वाधिक मोबाइल युजर्सला असल्याचे आकडेवारीतून दिसतेय. डाउनडिटेक्टरच्या आकडेवारीनुसार अंदाजे ७८% युजर्सला अॅपशी संबंधित समस्या येत आहेत. तर १३% वापरकर्त्यांनी वेबसाइटवर समस्या असल्याचे सांगितले. १०% युजर्सला सर्व्हर कनेक्शनची तक्रार दिली आहे.
डाउनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास भारतात इंस्टाग्राम वापरताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. अनेकांनी आपल्या तक्रारी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. काही लोकांनी इंस्टाग्राम वापरताना येत असलेल्या अडचणीचा अनुभव शेअर केलाय. 'इंस्टाग्राम डीएम बंद आहे का? हे पाहण्यासाठी प्रत्येकजण एक्सवर जात असल्याचे एका युजर्सने म्हटले आहे.' तर दुसऱ्याने पोस्ट केले की, 'मला एक महत्त्वाचा डीएम पाठवायचा असेल तेव्हाच इंस्टाग्राम डीएम बंद आहेत.'
मेटाने स्पष्टीकरण दिले का?
रिपोर्ट्सनुसार, इंस्टाग्राम ठप्प झाले असले तरीही अद्याप मेटाकडून कोणतेही अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलेले नाही. इंस्टाग्रामवर नेमका कशामुळे अडचण येत आहे? यामागील कारण काय? याबाबत माहिती मिळालेली नाही. इंस्टाग्राम वापरत असताना युजर्सला येत असलेल्या अडचणी कधी संपणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही जणांकडून लवकरच ही अडचण दूर होईल, असे म्हटलेय. इंस्टाग्राम डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडालय. पाहूयात कोण कोणते मिम्स व्हायरल झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
