SSC Exam : पुण्यातच दहावीचे २ पेपर फुटले, टेलिग्रामवरच्या अॅडमिनवर गुन्हा

Maharashtra SSC exam paper leak news : पुण्यात दहावीच्या सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान गणित १ आणि गणित २ या प्रश्नपत्रिका टेलिग्राम ग्रुपवर लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Maharashtra SSC Board Exam : विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यातच दहावीचे २ पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणित १ आणि गणित २ या विषयाचे पेपर फुटले. हे पेपर टेलिग्रामवर फुटल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. टेलिग्राम ग्रुप वरील मेसेज प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेदरम्यान गणित विषयाच्या दोन प्रश्नपत्रिका म्हटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षापूर्वीच गणित एक आणि दोन हे दोन्ही पेपर एका टेलिग्राम ग्रुप वर प्रसारित झाले. याप्रकरणी पुणे विभागीय मंडळ आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार ग्रुपचे प्रशासक आणि त्यातील सदस्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com