HPCL Jobs: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी; ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; वर्षाला पॅकेज ५० लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Hindustan Petroleum Recruitment: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या कंपनीत ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
HPCL Jobs
HPCL JobsSaam tv
Published On
Summary

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी

७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती

भरघोस पगार मिळणार

चांगल्या कंपनीत नोकरी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एचपीसीएल म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये इंजिनियर, ऑफिसर ते असिस्टं अशा सर्व पदांचा समावेश आहे. जवळपास ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन www.hindustanpetroleum.com अर्ज करायचा आहे.

HPCL Jobs
BSNL Recruitment: बीएसएनएलमध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, सिविल इंजिनियर, ऑफिसर, वित्त अधिकारी, केमिकल इंजिनियर, एचआर लीगल ऑफिसर, सिनियर ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, सीनियर सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजिस्ट अशा पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण ७३१ पदांसाठी भरती होणार आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियममधील या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी २५ ते ४३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३०,००० ते २,८०,००० रुपये पगार मिळणार आहे. सीनियर सायबर स्ट्रॅटेजिस्ट पदासाठी वर्षाला ५० ते ६० लाखांचे पॅकेज मिळणार आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियम लिमिटेडमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. ही परीक्षा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होऊ शकते.

HPCL Jobs
BMC Jobs: मुंबई महापालिकेत ५७ हजार रिक्त पदे; भरतीप्रक्रिया लवकरच होणार

पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांने संबंधित फील्डमध्ये ग्रॅज्युएशन/ 3 साल का फुल टाइम डिप्लोमा/ सायन्स ग्रॅज्युएट आणि फायर अँड सेफ्टी डिप्लोमा केलेला असावा. इंजिनियरिंग, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, एमबीए, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे, या नोकरीसाठी सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

HPCL Jobs
MSRTC Jobs: तयारीला लागा! एसटी महामंडळात १८ हजार पदांसाठी बंपर भरती, प्रताप सरनाईकांनी केली घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com