BMC Jobs: मुंबई महापालिकेत ५७ हजार रिक्त पदे; भरतीप्रक्रिया लवकरच होणार

BMC Recruitment 2026: मुंबई महापालिकेत तब्बल ५७ हजार पदे रिक्त आहे. महापालिकेत या पदांसाठी भरती करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी कामगार संघटनेने पत्र लिहलं आहे.
BMC Jobs
BMC JobsSaam Tv
Published On
Summary

राज्यात ७० हजार पदांसाठी भरती

मुंबई महापालिकेत ५७ हजार रिक्त पदे

पदभरती करण्याची मागणी

राज्यात सरकारी नोकरभरती होणार आहे. राज्यात नव्या पद्धतीने जवळपास ७० हजार पदांची भरती केली जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आहे. या भरतीमध्ये हजारो पदे ही मुंबई महापालिकेत भरती केली जाणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेत तब्बल ५७ हजार पदे रिक्त आहेत. ही पदे भरावी, अशी मागणी आता केली जाणार आहे.

BMC Jobs
BSNL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार ५० हजार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावलीत सुधारणा करण्याबाबत बैठक पार पडली होती. यामध्ये राज्यात नोकर भरती राबवण्यात येईल. ७० हजार पदे टप्प्याटप्प्याने भरली जातील, अशी घोषणा करण्यात आली. यानंतर महापालिकेतील रिक्त पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली जात आहे.

महापालिकेच्या निवडणूका झाल्या आहेत. त्यानंतर नोकरभरती लवकरात लवकर करावी, अशी मागणी केली जात आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांना पत्र पाठवून रिक्त पदे भरण्याची मागणी केली. या पत्रात म्हटलंय की, पालिकेत १२९ विभाग कार्यरत आहेत. यात ४ रुग्णालयाचे, प्रसतिगृहे, १६ उपनगरीय रुग्णालयचे आहे. या विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. सध्या महापालिकेत ९० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. रिक्त पदांवर भरती करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

BMC Jobs
Government Job: १० वी शिक्षण झालेल्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा कराल अन् शेवटची तारीख काय? जाणून घ्या

मुंबई महापालिकेतील रिक्त पदे भरण्यात येतील, असं आश्वासन पालिका प्रशासनाच्या वतीने दिले आहे. रुग्णालयातील रिक्त पदांवर कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी कार्यवाही सुरु आहे. कंत्राटी भरती बंद करावी आणि पदभरती करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

BMC Jobs
SBI Jobs: स्टेट बँकेत नोकरीची संधी; २२०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com