SBI Jobs: स्टेट बँकेत नोकरीची संधी; २२०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SBI Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत सर्किल बेस्ड ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.
SBI Job
SBI JobSaam Tv
Published On
Summary

स्टेट बँकेत नोकरीची संधी

२००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर

अर्ज करण्याची मुदत वाढवली

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेत सर्किल बेस्ड ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २००० पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती होणार आहे. आता या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे.

SBI Job
Post Office Recruitment: भारतीय डाक विभागात सर्वात मोठी भरती; २८,७४० पदे भरली जाणार; पात्रता फक्त १०वी पास

स्टेट बँकेत सर्किल बेस्ड ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी आता तुम्ही २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करु शकतात.

स्टेट बँकेची ही भरती बंगळुरु, चंदीगढ, चेन्नई, गांधीनगर, गुवाहाटी, नवी दिल्ली, मुंबई मेट्रो, जयपुर, कोलकत्तासह १६ ठिकाणी होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कामाचा अनुभव असायला हवा.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकूण २२३७ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही sbi.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २९ जानेवारीपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी आहे.

स्टेट बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्क्रिनिंग, इंटरव्ह्यू आणि लँग्वेज इफिशिएंसी टेस्टद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

SBI Job
Indian Bank Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार बँकेत नोकरी, पगार ८५,९२० रुपये; पात्रता काय?वाचा

पात्रता

एसबीआय सर्किल बेस्ड ऑफिसर पदासाठी उमेदवारांनी ग्रॅज्युएशन केलेले असावे. मेडिकल, इंजिनियरिंग, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंटची डिग्री प्राप्त केलेली असावे. उमेदवाराकडे बँकिंग कामाचा २ वर्षांचा अनुभव असायला हवा. याचसोबत स्थानिक भाषा लिहता-वाचता यायला हवी.

SBI Job
Railway Jobs: रेल्वेत सर्वात मोठी भरती! २२,००० पेक्षा जास्त पदे भरणार; अर्जप्रक्रिया सुरु; पगार किती मिळणार? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com