Indian Bank Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार बँकेत नोकरी, पगार ८५,९२० रुपये; पात्रता काय?वाचा

Indian Bank Recruitment 2026: इंडियन बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँकेत सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे.
Indian Bank Job
Indian Bank JobSaam Tv
Published On
Summary

इंडियन बँकेत नोकरीची संधी

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

स्पोर्ट्समॅन पदासाठी जाहीर केली भरती

बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन बँकेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. ऑफिसर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाहीये. स्पोर्ट्समॅन पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

Indian Bank Job
NPCIL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार ५५,९३२ रुपये; अर्ज कसा करावा?

ज्या उमेदवारांना खेळाची आवड आहे किंवा स्पोर्ट्स बॅकग्राउंडमधून आहेत. त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाहीये. फक्त स्क्रिनिंग, स्पोर्ट्स ट्रायल आणि इंटरव्ह्यूद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी indianbank.bank.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

इंडियन बँकेत ऑफिसर, JMG स्केल-I, क्लर्क पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्जप्रक्रिया ४ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२६ असणार आहे. या नोकरीसाठी १८ ते २६ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

इंडियन बँकेतील नोकरीसाठी निवड झाल्यावर ऑफिसरJMG स्केल I पदासाठी ४८४८०-८५९२० रुपये पगार मिळणार आहे. क्लर्क पदासाठी २४०५० ते ६४४८० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, चेस, वॉलीबॉल हे खेळ खेळता यायला हवे.

Indian Bank Job
Shani Mantras For Success In Job: नोकरी आणि व्यवसायात प्रगती हवीये? शनिदेवाच्या 'या' मंत्राचा करा जप

पात्रता

ऑफिसर पदासाठी उमेदवारांनी १२वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत स्पोर्टसमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. क्लर्क पदासाठी १२वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत स्टेट ज्युनियर नॅशनल किंवा नॅशनल स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व केलेले असावे.

Indian Bank Job
Prasar Bharti Job: प्रसार भारतीमध्ये सरकारी नोकरीची संधी; पात्रता काय? अर्ज कसा करावा? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com