RBI Recruitment
RBI RecruitmentSaam Tv

RBI Vacancy 2026: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी, ऑफिसर पदासाठी भरती; पगार ७८,४५० रुपये; अर्ज कसा करावा?

RBI ME Recruitment 2026: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर भरघोस पगार मिळणार आहे.
Published on
Summary

रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी

ऑफिसर पदासाठी भरती सुरु

पगार- ६२ हजार ते ७८ हजार रुपये

रिझर्व्ह बँकेत सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आता तुम्हाला चांगली नोकरी करण्याची संधी आहे. भारतीय रिझर्व्ह बँक सर्व्हिसेस बोर्ड (RBISB)ने नॉन सीएसजी (Non-CSG) कॅडर्ससाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी शॉर्ट नोटिफिकेशन जारी केले आहे. या नोकरीबाबत ६ फेब्रुवारी रोजी opportunities.rbi.org.in वेबसाइटवर सविस्तर माहिती दिली जाईल.

RBI Recruitment
Indian Oil Jobs: इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; आजच करा अर्ज

RBI नॉन सीएसजी कॅडर भरती

रिझर्व्ह बँकेत लीगल ऑफिसर ग्रेड बी, मॅनेजर (टेक्निकल सिविल) ग्रेड बी, मॅनेजर (टेक्निकल इलेक्ट्रिकल) ग्रेड बी, असिस्टंट मॅनेजर ग्रेड, असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकोल अँड सिक्युरिटी) ग्रेड ए पदांसाठी भरती होणार आहे. २१ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

पात्रता

लीगल ऑफिसर पदासाठी उमेदवारांनी लॉमध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. मॅनेजर(टेक्निकल सिविल) पदासाठी सिविल इंजिनियरिंगमध्ये बॅचलर पदवी प्राप्त केलेली असावी. मॅनेजर (टेक्निकल-इलेक्ट्रिकल ) पदासाठी इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.

RBI Recruitment
NPCIL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार ५५,९३२ रुपये; अर्ज कसा करावा?

पगार

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ६ फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून सुरु केली जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२६ आहे. या नोकरीसाठी २१ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी ग्रेड ए ऑफिसर पदासाठी ६२,५०० रुपये पगार मिळणार आहे. ग्रेड बी ऑफिसर पदासाठी ७८,४५० रुपये पगार मिळणार आहे.

RBI Recruitment
Prasar Bharti Job: प्रसार भारतीमध्ये सरकारी नोकरीची संधी; पात्रता काय? अर्ज कसा करावा? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com